ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवसेना गटनेते विश्वजित बारणे यांनी विविध प्रश्नांवरून प्रशासनाला घेरले..!

पिंपरी | पिंपरी-चिंचवड शहराला होणारा प्रदूषित पाणीपुरवठा, मोकाट श्वानाची दहशत, प्रशासकीय राजवटीत झालेला चुकीचा कारभार अशा विविध प्रश्नांवरून शिवसेना गटनेते विश्वजित बारणेपहिल्याच सर्वसाधारण सभेत महापालिका प्रशासनाला घेरले. विश्वजित यांनी पहिलेच भाषण अभ्यासपूर्ण आणि इंग्रजीमध्ये भाषेत केले. विश्वजित यांचे भाषण सुरू असताना सभागृह शांत होते. त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणीने सभागृहाचे लक्ष वेधले.

विश्वजित बारणे यांनी पाणी प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष वेधले. शहरातील पाणी प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. विस्कळीत, अपुरा, दूषित, अनियमित पाणीपुरवठा होत आहे. विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे नागरीक त्रस्त आहेत. महापालिका रावेत बंधाऱ्यातून अशुद्ध पाणी उपसा करते. येथील पाणी अतिशय दूषित आहे. येथील पाणी उचलून महापालिका त्यावर प्रक्रिया करून नागरिकांना देत आहे. मात्र, हे पाणी अतिशय दूषित असून या पाण्यामुळे भविष्यात कॅन्सरचे रुग्ण वाढण्याची भीती विश्वजित बारणे यांनी व्यक्त केली. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातून शिवणे येथे बंधारा बांधला आहे. महापालिकेने रावेतऐवजी शिवणे बंधाऱ्यातून शुद्ध पाणी उचलावे. त्यावर प्रक्रिया करून शहराला पाणीपुरवठा करावा.

हेही वाचा     :          पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘अजितसृष्टी’’ उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी!

चार वर्षाच्या प्रशासकीय राजवटीत अनागोंदी कारभार झाला आहे. अधिकाऱ्यांनी जनहिताची कोणतीही कामे केली नाहीत. खर्चीक कामे काढण्यावर भर दिला. परिणामी, प्रशासकीय राजवटीत महापालिका कर्जबाजारी झाली आहे. प्रशासकीय राजवटीमधील कामांची यादी प्रसिद्ध करावी. त्याचे लेखापरीक्षण करावे. जलनिस्सारण वाहिनीचे काम दर्जेदार झाले नाही. वाहिनी तुंबत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याकडेही बारणे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

श्वानाची निघते रॅली..

थेरगाव परिसरात मोकाट श्वानाचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. टोळीने श्वान फिरतात. निवडणुकीमध्ये प्रचारासाठी सर्व उमेदवारांनी रॅली काढली असेल. त्याचप्रमाणे थेरगाव परिसरात रात्रीच्या वेळी श्वानाची रॅली निघते. त्यामुळे मोकाट श्वानाचा बंदोबस्त करावा. नसबंदी वाढवावी. श्वानासाठी शेल्टरची सुविधा निर्माण करण्याची मागणीही बारणे यांनी केली.

तरुणांना संधी द्या..

महापालिका सभागृहात माझ्यासह यश साने, सिद्धार्थ बनसोडे असे तरुण नगरसेवक निवडून आले आहेत. आम्ही युवकांचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे महापौर रवी लांडगे यांनी तरुण नगरसेवकांना अधिक बोलण्याची संधी देण्याची मागणीही त्यांनी केली.

विश्वजित यांना मोठे राजकीय करिअर

विश्वजित यांच्या पहिल्याच अभ्यासपूर्ण भाषणाचे अनेक नगरसेवकांनी कौतुक केले. विश्वजित गटनेते असून त्यांना मोठे राजकीय करिअर असल्याचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button