ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये मोकाट जनावरांचा वाढता धोका

विधी समिती सभापती सुजाता बोराटे यांची कठोर नियमांची मागणी

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी

शहरातील मोकाट जनावरे, मोकाट कुत्रे आणि पाळीव प्राण्यांबाबत कठोर नियमावली लागू करण्याची मागणी विधी समिती सभापती सुजाता बोराटे यांनी महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देत केली आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्रे आणि जनावरांची समस्या गंभीर बनत चालली असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नुकत्याच चाकण परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर विधी समितीच्या अध्यक्षा सुजाता बोराटे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन सादर करत तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे जखमी झालेल्या नागरिकांची संख्या तब्बल ४० हजारांच्या घरात पोहोचली असून, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा      :                दिव्यांगांना सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी महापालिका कटिबद्ध : राणीमाई पठारे

बोराटे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, केवळ मोकाट प्राण्यांमुळेच नव्हे तर काही नागरिकांकडून पाळीव प्राण्यांची योग्य देखभाल केली जात नाही. अनेक वेळा पाळीव कुत्र्यांना मोकाट सोडले जाते किंवा सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे नियम पाळले जात नाहीत, यामुळेही नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:

  • शहरातील मोकाट कुत्रे व जनावरांवर नियंत्रणासाठी विशेष मोहिमा राबविणे
  • कुत्र्यांचे निर्बिजीकरण (स्टेरिलायझेशन) आणि लसीकरण यावर अधिक भर देणे
  • कुत्र्यांच्या हल्ल्यांची संख्या जास्त असलेल्या भागांमध्ये विशेष पथके नियुक्त करणे
  • पाळीव प्राणी धारकांसाठी कठोर नियमावली लागू करणे
  • नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे
  • नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष उपक्रम राबविणे

पिंपरी-चिंचवड शहरात मोकाट कुत्रे व जनावरांची समस्या अत्यंत गंभीर बनली असून, नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कठोर नियमावली लागू करून निर्बिजीकरण, लसीकरण आणि नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही.आमदार महेशदादा लांडगे यांनी याबाबत विधानसभा सभागृहातही आवाज उठवला होता. त्यांच्याच मार्गदर्शनात आम्ही याबाबत पाठपुरावा करू, या गंभीर विषयावर तातडीने लक्ष देऊन महापालिकेने ठोस निर्णय घ्यावेत.

– सुजाता बोराटे, सभापती, विधी समिती, पिं. चिं. मनपा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button