ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये ५ सार्वजनिक ग्रंथालयांना मुदतवाढ प्रस्ताव

PCMC: महापालिकेतर्फे वाचन संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न

पिंपरी-चिंचवड | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या सार्वजनिक ग्रंथालयांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. शहरातील शाहूनगर, संभाजीनगर, आकुर्डी, संत तुकारामनगर आणि केशवनगर-चिंचवड येथील एकूण पाच सार्वजनिक ग्रंथालयांची विद्यमान मुदत संपुष्टात आल्याने या ग्रंथालयांना पुढील ११ महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.

महापालिका सभा ठराव क्र. ६२७ दिनांक १० फेब्रुवारी २०१५ नुसार, महानगरपालिकेच्या वतीने चालविण्यात येणारी सर्व सार्वजनिक ग्रंथालये संबंधित प्रभागातील जेष्ठ नागरिक संघ, महिला बचत गट तसेच स्थानिक संस्था व मंडळे यांच्याकडे चालविण्यास देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या संस्थांना प्रत्येक ग्रंथालयासाठी दरमहा रुपये १०,००० मानधन देण्यात येते. त्यानुसार वरील पाचही ग्रंथालये मागील कालावधीत ११ महिन्यांच्या करारावर चालविण्यात आली होती.

हेही वाचा       :            चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयाच्या देखभालीसाठी मुदतवाढ प्रस्ताव 

सद्यस्थितीत या ग्रंथालयांची मुदत पूर्ण झाल्याने ती अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी मुदतवाढ देणे आवश्यक ठरले आहे. महानगरपालिकेच्या सार्वजनिक ग्रंथालय विभागाकडे कर्मचारी संख्या अपुरी असल्यामुळे ग्रंथसंपदेचे जतन करणे व नागरिकांना नियमित वाचन सेवा उपलब्ध करून देणे या दृष्टीने स्थानिक संस्थांची मदत महत्त्वाची ठरत आहे. या प्रस्तावानुसार संबंधित पाचही ग्रंथालयांना पुन्हा ११ महिन्यांच्या कालावधीसाठी त्याच अटी व शर्तींवर आणि प्रती ग्रंथालय दरमहा रुपये १०,००० मानधनावर चालविण्यास देण्यास मान्यता देण्याची शिफारस करण्यात येणार आहे. यासाठी होणाऱ्या खर्चासही स्थायी समितीची मंजुरी घेणे अपेक्षित आहे.

क्रीडा व सांस्कृतिक समिती सदस्य नगरसेवक योगेश लांडगे म्हणाले की, “शहरातील वाचन संस्कृती जपण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना ज्ञानसंपदेचा लाभ मिळावा यासाठी सार्वजनिक ग्रंथालये सतत सुरू राहणे अत्यावश्यक आहे. स्थानिक संस्थांच्या सहभागामुळे ही सेवा अधिक प्रभावीपणे दिली जात आहे,” असे त्यांनी नमूद केले. या प्रस्तावास स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर शहरातील वाचनप्रेमींना अखंडित सेवा मिळत राहणार असून, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ग्रंथालय व्यवस्थापनाचा उपक्रम अधिक बळकट होणार आहे.

शहरातील वाचनसंस्कृती टिकवणे आणि नागरिकांना ज्ञानसंपदेचा अखंडित लाभ मिळवून देणे हा आमचा प्राथमिक उद्देश आहे. पाचही सार्वजनिक ग्रंथालयांना मुदतवाढ देण्याच्या निर्णयामुळे स्थानिक संस्थांच्या सहभागातून सेवा अधिक प्रभावीपणे चालेल, आणि नागरिकांना वाचनासाठी नियमित सुविधा उपलब्ध राहतील. आम्ही या उपक्रमाला पूर्ण पाठिंबा देत आहोत आणि नागरिकांसाठी उत्तम वाचनसुविधा सुनिश्चित करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू.

– योगेश लांडगे, सदस्य, क्रीडा व सांस्कृतिक समिती.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button