ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

“मास्टर”होण्यासाठी रियाज, सातत्य अत्यावश्यक : शिल्पकार प्रमोद कांबळे

आकृती प्रदर्शनात कांबळे यांना डी वाय पाटील जीवनगौरव पुरस्कार प्रदान

पिंपरी-चिंचवड | कोणत्याही क्षेत्रात “मास्टर” होण्यासाठी “रियाज” आणि सातत्य,आणि एकाग्रता असणे अत्यावश्यक आहे.कला ही भावनेशी जोडलेली असल्याने स्वतःला झाकून काम केल्यास उत्तम कलाकृती निर्माण होते. असे सांगून तंत्रज्ञानाने किती ही प्रगती केली तरी नवनिर्मितीसाठी कौशल्याला कधीचं कोणताही पर्याय नाही व तसेच भविष्यातही नसेल, असे मत जेष्ठ शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी व्यक्त केले.

आकुर्डीच्या डॉ डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीतील स्कूल ऑफ अप्लाईड आर्ट अँड क्रॉफ्टसच्या वतीने भरविण्यात आलेल्या “आकृती” चित्र प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी प्रमोद कांबळे यांना डी वाय पाटील जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते.

५१ हजार रोख, मानपत्र, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. समारंभाला जाहिरात कलादिग्दर्शक महेश घरत, चित्रकार पराग बोरसे, कुलगुरू प्रा. मनिष भल्ला, मुख्य वित्तीय अधिकारी बिपीन शर्मा, कुलसचिव डॉ. बिरान मोईदीन, डॉ माधवी देशपांडे, डॉ अनुपमा पाटील, डॉ मधुरा जगताप, स्कूल ऑफ अप्लाइईड आर्टस् अँड क्रॉफ्टचे संचालक जयप्रकाश कलवले आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा      :              ‘पीएमआरडीए’चा आशियाई विक्रम.. अवघ्या ९५ दिवसांत उभी राहिली १४ मजली इमारत..! 

स्कूल ऑफ अप्लाईड आर्ट अँड क्रॉफ्टस च्या २२५ हून अधिक उपयोजित कला विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतींचे ‘आकृती’ प्रदर्शनाचे उद्घाटन कलादिग्दर्शक महेश घरत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कला प्रदर्शनामुळे विद्यापीठातील वातावरण उत्साहवर्धक व आल्हाददायक झाल्याचे सांगत कुलगुरू प्रा मनिष भल्ला यांनी विद्यार्थ्यांचे व अध्यापकांचे कौतुक करून प्रोत्साहन दिले.

डी वाय पाटील प्रतिष्ठान चे वित्त-लेखाधिकारी बिपीन शर्मा म्हणाले की, आज च्या घडीला कला हे नुसते सजावटीचे माध्यम राहिले नसून, सुसंवाद व प्रेरणादायी स्तोत्र ही ठरत आहे कारण कलेद्वारे असंख्य प्रश्न ही सहज सुटू शकतात हे सिद्ध झालेले आहे. यावेळी सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार यश शेवाळे याला देण्यात आला. वर्गनिहाय विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदर्शन समन्वयक डॉ नितीन तावरे, शरद वडकर, राजेश पुजारी, अध्यापक वृंद प्रा. शंकर आडेराव, डॉ. राहुल वेलदोडे प्रा. पल्लवी पांढरे, प्रा सुरभी गुळवेलकर, प्रा. कृष्णा सावंत, प्रा. श्याम पगारे, प्रा. विजया लक्ष्मी, प्रा संकेत भलारे, एम एल जगदाळे, अमेंद्र देशमुख, दर्शना गायकवाड, स्नेहल मगरे, अमोल हरगुडे, जगन्नाथ चौगुले व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

डी वाय पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या कलादालनात आकृती हे विद्यार्थ्यांच्या कलाकृतीं चे प्रदर्शन दि. ११ ते १८ एप्रिल पर्यंत स १० ते सायं ७ वाजेपर्यंत कला रसिकांसाठी विनामूल्य खुले असल्याची माहिती स्कूल ऑफ अप्लाइड आर्टस् अँड क्रॉफ्टचे संचालक जयप्रकाश कलवले यांनी दिली. सूत्रसंचालन कु. क्रिन्जल जैस्वाल केले तर आभार कु. सारथा राजकुवर यांनी मानले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button