Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडचा पै. श्लोक ताम्हाणे यांनी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कमावले कांस्यपदक

पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ, भारतीय कुस्ती संघ व महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 15 वर्षांखालील राज्यस्तरीय फ्रीस्टाईल व ग्रिकोरोमन अंजीक्यपद कुस्ती स्पर्धा 2025-2026 मध्ये पै. श्लोक संदीप ताम्हाणे यांनी ग्रिकोरोमन कुस्ती प्रकारात कांस्यपदक पटकावले.

श्लोक ताम्हाणे यांचे हे यश त्यांच्या कठोर मेहनतीचे आणि कुस्ती क्षेत्रातील निष्ठेचे प्रतीक आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या या कामगिरीने राज्यातील तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

हेही वाचा –  पिंपरी-चिंचवडमध्ये अतिक्रमण कारवाईचा धडाका!

याबाबत आमदार महेश लांडगे म्हणाले की, “श्लोक ताम्हाणे यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत जो उत्कृष्ट पराक्रम केला आहे, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. ही फक्त कांस्यपदक जिंकण्याची गोष्ट नाही, तर मेहनत, चिकाटी आणि धैर्य यांचे उत्तम उदाहरण आहे. पिंपरी-चिंचवड शहर स्पोर्ट्स सिटी बनवण्याचा संकल्प आम्ही केला आहे. भोसरीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती व कबड्डी संकुल सुरू झाले असून, त्या ठिकाणी अनेक मल्ल खेळाडू सराव करीत आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्केटिंग ग्राउंड, बॉक्सिंग रिंग, शुटींग रेंजसुद्धा सुविधा उपलब्ध होत आहेत. यासोबतच मल्टिपर्पज क्रिकेट स्टेडिअमही प्रस्तावित आहे.श्लोकच्या या यशाने राज्यात कुस्तीच्या क्षेत्रात नव्या पिढीला उत्साह मिळाला असून, भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे नाव उजळवण्यासाठी ही प्रेरणा महत्वाची ठरेल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

” पै. श्लोक ताम्हाणे यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत जे यश मिळवले आहे, ते त्यांच्या मेहनत, चिकाटी आणि धैर्याचे उत्तम उदाहरण आहे. आम्ही पिंपरी-चिंचवड शहराला स्पोर्ट्स सिटी बनवण्याच्या दिशेने कार्यरत आहोत. भोसरीतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती व कबड्डी संकुल, स्केटिंग ग्राउंड, बॉक्सिंग रिंग आणि शुटींग रेंजसारख्या सुविधा सुरू आहेत. यासोबतच मल्टिपर्पज क्रिकेट स्टेडिअमही प्रस्तावित आहे. राज्य सरकार प्रत्येक प्रतिभावंत खेळाडूच्या विकासासाठी संपूर्ण पाठबळ देत राहील.”

– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button