Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा ५ हजार ६६० कोटींचा अर्थसंकल्प

स्थायी समितीसमोर सादर : स्थायी समितीकडून बैठक तहकूब

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आर्थिक वर्ष २०२६–२७ च्या ५ हजार ६६० कोटी ७३ लाख रुपयांच्या (आरंभीच्या शिल्लकेसह) अंदाजपत्रकाचे सादरीकरण आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचेकडे केले. केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजनांसह हा अर्थसंकल्प ९ हजार ३२२ कोटी १७ लाख रुपयांचा असल्याची माहिती त्यांनी दिली.

आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले की, २०२६–२७ या आर्थिक वर्षात ५,६६०.७३ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित असून त्यापैकी ५,६५५.७३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत. मार्च २०२७ अखेर ५ कोटी रुपये शिल्लक राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा नागरिक सहभाग उपक्रमांतर्गत दुप्पट म्हणजे सुमारे ४,९९६ सूचना प्राप्त झाल्या असून त्यापैकी २९७ सूचनांचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे.

क्षेत्रीय विकासासाठी भरीव तरतूद

महापालिकेच्या अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयांअंतर्गत विकासकामांसाठी अनुक्रमे ६.२९ कोटी, ११.४९ कोटी, १०.२५ कोटी, ११.४४ कोटी, ३.७० कोटी, ९.३० कोटी, ५.२८ कोटी आणि ७.९२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

हेही वाचा –  मुंबई – गोवा महामार्गाबाबत राज्य सरकारची मोठी घोषणा

अर्थसंकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये :

1. विकासकामांसाठी एकूण १,१८६ कोटी रुपये
2. स्थापत्य विशेष योजनेसाठी ४३६.९४ कोटी रुपये
3. महापौर निधी – ५० कोटी रुपये
4. शहरी गरीब (बीएसयूपी) – १,९५३ कोटी रुपये
5. जेंडर बजेट – ९९ कोटी रुपये
6. दिव्यांग कल्याणकारी योजना – ६८.३० कोटी रुपये
7. पाणीपुरवठा भांडवली कामे – १५५.७३ कोटी रुपये
8. पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित (पीएमपीएमएल) – ४०० कोटी रुपये
9. भूसंपादन – १०० कोटी रुपये
10. अतिक्रमण निर्मूलन – १० कोटी रुपये
11. स्मार्ट सिटी – ५० कोटी रुपये
12. अमृत २.० योजना – ५४.४५ कोटी रुपये

चालू व प्रस्तावित प्रकल्पांमध्ये नवीन प्रशासकीय इमारत, डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपूल, मोशी रुग्णालय, थेरगाव येथील पीपीपी कर्करोग रुग्णालय, अग्निशमन प्रबोधिनी इमारत, मामुर्डी–सांगवडे/हिंजवडी पूल, ड्रेनेज मास्टर प्लॅन, पीसीएमसी सिटी सेंटर, अण्णासाहेब मगर स्टेडियम, हरित सेतू, टेल्को रोड एनएमटी प्रकल्प, पाणीपुरवठा सुधारणा (भामा आसखेड – अमृत २.०), प्रधानमंत्री आवास योजना, बायोडायव्हर्सिटी पार्क (तळवडे), मुळा व इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प, मोशी कचरा डेपो बायोगॅस प्रकल्प, सांडपाणी पुनर्चक्रीकरण, एकात्मिक घनकचरा प्रक्रिया प्रकल्प आदींचा समावेश आहे.

विभागनिहाय भांडवली खर्च :

1. स्थापत्य विभाग – ७२७.९२ कोटी रुपये
2. भूसंपादन – १०० कोटी रुपये
3. विद्युत विभाग – ३२.७८ कोटी रुपये
4. पाणीपुरवठा – १५५.७३ कोटी रुपये
5. जलनि:सारण – १८.२६ कोटी रुपये
6. पर्यावरण विभाग – २४.३५ कोटी रुपये
7. ‘प’ अंदाजपत्रकांतर्गत विविध कामे – ३४.१० कोटी रुपये

लोकाभिमुख आणि संतुलित विकासाचा आराखडा

हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा दस्तऐवज नसून शहराच्या सर्वांगीण आणि संतुलित विकासाचा ठोस आराखडा आहे. पायाभूत सुविधा, पर्यावरण, पाणीपुरवठा, सामाजिक न्याय आणि शाश्वत विकास यांना प्राधान्य देण्यात आले आहे. महिलांसाठी जेंडर बजेट, दिव्यांगांसाठी कल्याणकारी तरतूद, शहरी गरीबांसाठी मोठा निधी आणि नागरिकांच्या सूचनांचा समावेश यामुळे हा अर्थसंकल्प लोकाभिमुख व उत्तरदायी प्रशासनाचे प्रतीक असल्याचा विश्वास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button