ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

‘पीसीसीओई’ माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात

शिक्षण विश्व: गॅलेक्सी ऑफ पीसीसीओई स्टार्स स्मरणिकेचे प्रकाशन

पिंपरी-चिंचवड | पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (पीसीसीओइ) येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात “गॅलेक्सी ऑफ पीसीसीओइ स्टार्स” स्मरणिकेचे शानदार प्रकाशन करण्यात आले, ज्यामध्ये माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, करिअर प्रवास आणि विविध क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेतला गेला.

पीसीसीओइचे उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे यांनी सांगितले की, पीसीसीओइमध्ये फक्त तांत्रिक शिक्षण नाही तर जबाबदार, सुसंस्कृत आणि मानवतावादी दृष्टिकोन ठेवणारा नागरिक घडवण्याचे काम केले जाते. येथे विद्यार्थ्यांना ज्ञान व कौशल्य आधारित प्रकल्प, विविध उपक्रम आणि मॉक टेस्ट इंटरव्ह्यूसद्वारे तयार केले जाते.

मेळाव्यात पीसीइटीचे सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी मार्गदर्शन करत सांगितले की, उत्कृष्ट करिअर करण्यासाठी एखाद्या विषयात तज्ज्ञ होणे आवश्यक आहे. यश मिळाल्यानंतर थांबू नये, तर इतरांना मार्गदर्शन व प्रोत्साहन द्यावे. त्यांनी सांगितले की, माजी विद्यार्थ्यांनी बनवलेले नेटवर्क हेच “गॅलेक्सी ऑफ पीसीसीओइ स्टार्स” आहे आणि ही स्मरणिका इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल.

हेही वाचा       :                ‘‘डब्ल्यूटीई’’ उद्योग समूहाकडून क्रांतिवीरांना विधायक श्रद्धांजली!

कार्यक्रमात पीसीसीओइ माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डेनिस थॉमस, उपाध्यक्ष बसवराज वामा, प्रसाद श्रीरामे, युवराज पवार, शबरीश नायर, प्रवीण भोर, सौरभ बेदमुथा तसेच प्राध्यापक हिना शर्मा, विजय टोपे, ऋषिकेश पांडे, पायल काळे, संदीप पिल्लेवार, निखिल सुरवडे, शैलेश गलांडे, तन्मय खांबेकर, स्फूर्ती देशमुख, डेझेंटा लोबो, मंगेश काळभोर आणि विद्यार्थी प्रतिनिधी निशांत कुलकर्णी, प्रसाद कोलते उपस्थित होते. देश-विदेशातील विविध क्षेत्रांत यशस्वी झालेले २०० पेक्षा अधिक माजी विद्यार्थी आणि प्राध्यापकही उपस्थित होते.

पीसीइटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओइ संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम पीसीसीओइच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला, ज्यातून ज्ञान, अनुभव आणि नेटवर्किंगचे महत्त्व अधोरेखित झाले.

विद्यार्थ्यांसाठी परिसंवाद मार्गदर्शक…

यावेळी “उद्योग व शिक्षण क्षेत्रातील दरी कमी करणे” या विषयावर परिसंवाद आयोजित केला गेला. डेनिस थॉमस यांनी इंटरशिपच्या महत्त्वावर भर दिला तर शबरीश नायर यांनी आयआयटीच्या अनुभवातून मिळालेल्या लोकांशी संवाद साधण्याच्या अनुभवाचे महत्त्व सांगितले. प्रसाद श्रीरामे यांनी पीसीसीओइमुळे जीवनातील मूल्ये आणि सामाजिक जडणघडण मिळाल्याचे स्पष्ट केले. प्रवीण भोर यांनी मराठी भाषा जपण्याचे महत्त्व सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button