न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रक्षाबंधन साजरे
शिक्षण विश्व : विद्यार्थ्यांनी राख्या बांधून जपले विश्वासाचे नाते

पिंपरी चिंचवड | मिलेनियम एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, थेरगाव येथे नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या हातांनी बनवलेल्या राख्या बांधून भावंडांचे अतूट नाते साजरे केले.
या कार्यक्रमाद्वारे शाळेने विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती आणि परंपरेची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मुलींनी स्वतः तयार केलेल्या राख्या शाळेतील मुलांना बांधल्या आणि मिठाई भरवून त्यांचे तोंड गोड केले. या उपक्रमामुळे शाळेतील वातावरण आनंदमय आणि संस्कृतीशील झाले होते.
हेही वाचा : विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या अपमानाविरुद्ध महामोर्चा
कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष विजय पवार, सचिव अशोक मोरे, खजिनदार सुरेखा पवार, उपाध्यक्ष निलेश पलघोमल, तसेच सदस्य विलास शेलार, जयवंत बाबर, रमेश पाटील, सुरेश पवार, विनायक पवार, नैना माने आणि नीलम पवार यांनी सहभाग घेतला. शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या नाइक व नायगम एगनीस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पुढाकारामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. अध्यक्ष विजय पवार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचेही विशेष अभिनंदन केले.





