पिंपरी / चिंचवड

खासदार निलेश लंके यांचा अनुराधा साळुंखे यांना जाहीर पाठिंबा

अनुराधा साळुंखे यांच्या उमेदवारीला नगरवासीयांचे मोठे बळ

पिंपरी चिंचवड: नगरचे खासदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार अनुराधा साळुंखे यांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. अनुराधा साळुंखे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाल्याबद्दल खासदार लंके यांनी त्यांचे अभिनंदन करत हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की, अनुराधा साळुंखे या सक्षम, अभ्यासू आणि जनतेच्या प्रश्नांबाबत संवेदनशील नेतृत्व आहेत. त्यांच्या पाठीशी आपण कायम खंबीरपणे उभे राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या प्रत्येक प्रयत्नात आपला पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य राहील, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

हेही वाचा –  मोदी सरकारचा महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय; ‘या’ महामार्गाला मिळाली मंजुरी

दरम्यान, दीपक साळुंखे हे नगरचे जावई असून, त्यांच्या सामाजिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे नगरशी असलेले नाते अधिक दृढ असल्याचेही यावेळी खासदार निलेश लंके यांनी नमूद केले. या जाहीर पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि अनुराधा साळुंखे यांच्या उमेदवारीला मोठे बळ मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button