Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

एमआयटी महाविद्यालयाची टाइम्स बीबीए रँकिंगमध्ये उज्वल कामगिरी

देशभरातील टॉप ५० खाजगी बीबीए संस्थांमध्ये ३४ वे स्थान; पुण्यात दुसरा क्रमांक

पिंपरी-चिंचवड | एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, आळंदी यांनी “टाइम्स बीबीए एज्युकेशन रँकिंग सर्व्हे २०२५” मध्ये भरीव यश संपादन करत देशभरातील आणि प्रादेशिक बीबीए शिक्षण संस्थांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

या राष्ट्रीय रँकिंगमध्ये एमआयटी महाविद्यालयाने खालीलप्रमाणे उल्लेखनीय स्थान मिळवले: देशातील टॉप ७० बीबीए महाविद्यालयांमध्ये ४९ वा क्रमांक, खाजगी बीबीए संस्थांमध्ये देशात ३४ वे स्थान, पश्चिम विभागात ७ वा क्रमांक, पुणे शहरात दुसरा सर्वोत्तम बीबीए महाविद्यालय म्हणून गौरव अशी कामगिरी केली आहे.

हेही वाचा      :        स्मार्ट सिटीतील महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता; प्राथमिक शाळांमध्ये तब्बल 184 पदे रिक्त 

शिक्षक, विद्यार्थी आणि नेतृत्व यांचा एकत्रित यशाचा परिणाम

महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. वाफारे यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करत सांगितले, “ही मान्यता आमच्या समर्पित प्राध्यापक, कर्मचारी आणि प्रतिभावान विद्यार्थ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फळ आहे. जागतिक दर्जाचे व्यवसाय शिक्षण देण्याच्या आमच्या कटिबद्धतेची ही पावती आहे.” यशाच्या या पर्वावर उपसंचालक डॉ. मानसी अतितकर, अधिष्ठाता डॉ. अमोल माने, विभागप्रमुख प्रा. आकांक्षा लांडगे, तसेच प्रा. अक्षदा कुलकर्णी यांनी देखील समाधान व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांच्या यशामध्ये महाविद्यालयाच्या योगदानाची प्रशंसा केली.

बीबीए शिक्षणात गुणवत्ता आणि कौशल्यांचे अधिष्ठान

ही रँकिंग एमआयटी महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण बीबीए शिक्षण, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष आणि उद्योगजगतातील गरजांनुसार तयार केलेल्या अभ्यासक्रमांचे प्रतिबिंब आहे. एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज व्यवसाय शिक्षणात आपले स्थान अजून अधिक बळकट करत आहे, आणि येणाऱ्या काळात आणखी प्रगती साधण्याच्या दिशेने पावले टाकत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button