Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
वाकडमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी गाड्यांच्या सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग, ३५-४० गाड्या जळून खाक

वाकड : वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेडगे वस्ती येथील गझेबो हॉटेलच्या मागे असलेल्या बजाज कंपनीच्या ‘इथर’ इलेक्ट्रिक दुचाकी गाड्यांच्या सर्व्हिसिंग सेंटर असलेल्या पत्र्याच्या गोडाउनला आज (दि.२१) पहाटे ३.०० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.
हेही वाचा – पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन
या आगीत गोडाउनमध्ये सर्व्हिसिंगसाठी आलेल्या सुमारे ३५ ते ४० दुचाकी गाड्या आणि इतर साहित्य जळून मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणी जखमी झाले नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आग त्वरित विझवली. आगीच्या नेमक्या कारणांचा शोध वाकड पोलीस घेत आहेत.





