पिंपरी / चिंचवड

विकासाचा आणखी एक अध्याय लिहिण्यासाठी व्हिजन असलेल्या राष्ट्रवादीच्या पॅनलला विजयी करा- संदीप वाघेरे यांचे आवाहन

पिंपरी :पिंपरी चिंचवड महापालिकेत मला आपण नगरसेवक म्हणून निवडून पाठवल्यापासून पिंपरी गावच्या विकासासाठी अनेक कामे केली.विकासाचा आणखी एक अध्याय लिहिण्यासाठी व्हिजन असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी गाव प्रभाग क्रमांक 21 मधील उमेदवार संदीप वाघेरे यांनी केले.

पिंपरी गाव प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे, निकिता कदम यांच्या प्रचारार्थ अशोक थिएटर, दुर्गा माता मंदिर, बलदेव नगर समोरील भाग, दुर्गा माता मंदिर रोड, शास्त्री उद्यान परिसरात पदयात्रा काढून मतदारांशी संपर्क साधण्यात आला. या प्रचार फेरीस उदंड प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी महिला भगिनींनी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा –  सत्ताधाऱ्यांच्या प्रतोदांना मंत्रिपदाचा दर्जा आणि सेवा सुविधा 

या प्रचार फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे, निकिता कदम तसेच सोनु कदम, नरेश पवार, कुणाल सातव, प्रवीण कुदळे नागेश वाघेरे,राजु वाघेरे, विजय जाचक,अनिल रसाळ,अक्षय नाणेकर, एकनाथ पारखे, संदीप कुदळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी संदीप वाघेरे म्हणाले की, माझा शब्दांपेक्षा कामावर विश्वास आहे. आश्वासनांपेक्षा माझा कृतीवर अधिक भर राहिला आहे. हेच आमचे बळ आहे.हाच आमचा निर्धार आहे. महापालिकेत नगरसेवक या नात्याने काम करताना पिंपरी गावचे विकासासाठी सतत प्रयत्नशील राहिलो. विकासाचा आणखी एक अध्याय लिहिण्यासाठी प्रभाग क्रमांक 21 मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण पॅनेल विजयी करण्याचे आवाहन वाघेरे यांनी केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button