पिंपरीत आमदार अमित गोरखे यांनी केले सहपरिवार मतदान; युवक, महिला व ज्येष्ठांना मतदानाचे आवाहन
लोकशाहीचा उत्सव: काळभोरनगर येथील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा अधिकार

पिंपरी-चिंचवड | राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये मतदान प्रक्रिया शांततेत आणि उत्साहात पार पडत आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी विधानसभेतील स्वामी विवेकानंद काळभोरनगर येथील मतदान केंद्रावर आमदार अमित गोरखे यांनी सहपरिवार आपला मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आमदार अमित गोरखे यांनी युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व मतदार बांधवांना लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. “लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे. मतदान हा केवळ हक्क नसून एक जबाबदारी आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
हेही वाचा : भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी बजावला मतदानाचा हक्क!
प्रभाग क्रमांक १० मधील भाजप उमेदवारांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला असून, सर्व नागरिकांनी आपला लोकशाहीतील महत्त्वाचा अधिकार बजावावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवक-युवतींमध्ये मोठा उत्साह आणि वेगळाच आनंद दिसून येत असून, लोकशाही सण साजरा करण्याचा हा क्षण असल्याचे माजी नगरसेविका अनुराधाताई गोरखे यांनी सांगितले.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने पिंपरी विधानसभेत जास्तीत जास्त म्हणजेच १०० टक्के मतदान होण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत असून, प्रत्येक मतदाराने निर्भयपणे आणि उत्साहाने मतदान करावे, असे आवाहन आमदार अमित गोरखे यांनी केले आहे. लोकशाही प्रक्रियेत जनतेचा मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढावा, हाच या आवाहनामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.





