पिंपरी / चिंचवड

‘प्रामाणिक काम, विकासावर ठाम’; प्रभाग ७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झंझावात!

​ मतदारांचा 'घड्याळा'कडे ओढा

​ पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ चा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, प्रभाग क्रमांक ७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. “प्रामाणिक काम आणि विकासावर ठाम” हा मंत्र घेऊन रिंगणात उतरलेल्या या उमेदवारांना जनमानसातून मोठा प्रतिसाद मिळत असून, ‘प्रभाग ७ मध्ये विजयाचे घड्याळच टिकटिकणार’, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

​ घरोघरी संवाद आणि विकासाचा रोडमॅप
​काल प्रभाग ७ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्रचारफेरी दरम्यान उमेदवारांनी घरोघरी जाऊन रहिवाशांशी थेट संवाद साधला. गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे आणि आगामी काळातील प्रगत प्रभागाचे व्हिजन त्यांनी मतदारांसमोर मांडले. यावेळी स्थानिक महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून स्वागत केले. महिलांच्या समस्या जाणून घेत, त्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले. विशेष म्हणजे, ‘वैष्णव विचार कीर्तन महोत्सवा’च्या निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील काल्याच्या महाप्रसादालाही उमेदवारांनी हजेरी लावून ह.भ.प. भागवत महाराज शिरवळकर यांचे आशीर्वाद घेतले.

​ सुशिक्षित उमेदवारांची फळी हीच खरी ताकद

प्रचारादरम्यान बोलताना उमेदवार म्हणाले की, “यावेळी प्रभाग ७ मध्ये परिवर्तनाचे वारे वाहत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार सुशिक्षित आणि अभ्यासू आहेत. महापालिकेच्या नवनवीन योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची क्षमता या उमेदवारांमध्ये आहे. पक्षाची मजबूत संघटनात्मक बांधणी आणि समाजकार्याची तळमळ यामुळे मतदारांचा कल स्पष्टपणे राष्ट्रवादीकडे दिसून येत आहे.”

हेही वाचा –  ‘श्री संत वामनभाऊ महाराजांचे विचार पिढ्या न पिढ्या मार्गदर्शक’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

​ सर्वसमावेशक आणि सक्षम उमेदवारांना संधी दिली

​विराज विश्वनाथ लांडे (अ – ओबीसी पुरुष उमेदवार)
​अनुराधा सुशिल लांडगे (ब – सर्वसाधारण महिला उमेदवार)
​अश्विनी निलेश फुगे (क – सर्वसाधारण महिला उमेदवार)
​अमोल मधुकर डोळस (ड – सर्वसाधारण पुरुष उमेदवार)

​स्थानिक प्रश्नांवर ठाम भूमिका

​प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा आणि आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांची जाण असलेले हे नेतृत्व महापालिकेत पाठवण्यासाठी मतदारांनी सज्ज व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विकासाभिमुख दृष्टिकोन आणि जनतेशी असलेली नाळ यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने या भागात आपली पकड मजबूत केली आहे.

​ मतदान करण्याचे आवाहन:

येत्या गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. “घड्याळ” चिन्हा समोरील बटण दाबून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांनी केले आहे.
लक्षात ठेवा… ‘‘घड्याळ’’ तेच… फक्त वेळ नवी..!

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button