मोशी प्राधिकरण येथे ‘सिल्वराईज ग्रँड स्काय’ प्रकल्पाचे भूमिपूजन

मोशी | मोशी प्राधिकरण (सेक्टर क्र. ६) पाण्याच्या टाकी शेजारी व नवीन आरटीओच्या बाजूला सिल्वराईज ग्रुपतर्फे उभारण्यात येणाऱ्या “सिल्वराईज ग्रँड स्काय” या भव्य गृहप्रकल्पाचे भूमिपूजन आमदार महेशदादा लांडगे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
या प्रसंगी उद्योजक संतोष बारणे, प्रताप बारणे यांच्यासह सिल्वराईज कंपनीचे अधिकारी, मान्यवर व अनेक नागरिक उपस्थित होते.
सिल्वराईज ग्रुपने आतापर्यंत बांधकाम क्षेत्रात प्रामाणिकपणा, कामाची गुणवत्ता, वेळेचे काटेकोर नियोजन आणि ग्राहकांच्या विश्वासाचे भक्कम अधिष्ठान निर्माण केले आहे. ग्राहकांच्या स्वप्नातील घर वेळेत व गुणवत्तेसह पूर्ण करून देण्याचा विश्वास जपत हा समूह सातत्याने पुढे जात आहे.
हेही वाचा : नवरात्रोत्सवासाठी मातीचे घट आणि साहित्याच्या टंचाईने कुंभार बांधव त्रस्त

याच परंपरेतून उभारण्यात येणाऱ्या “सिल्वराईज ग्रँड स्काय” या भव्य कमर्शियल व रेसिडेन्शियल प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याला सिल्वराईज ग्रुपच्या सर्व सहकाऱ्यांनी, मित्रपरिवाराने व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सिल्वराईज ग्रुपच्या सातत्यपूर्ण गुणवत्तेमुळे पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्यातील ग्राहकांचा विश्वास दृढ झाला असून, “ग्रँड स्काय” प्रकल्प या विश्वासाला नवी उंची देणार आहे.





