Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडची अंतिम प्रभाग रचना मंजूर

महापालिकेच्या संकेतस्थळावर ,मुख्यालय आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयात अंतिम प्रभाग रचना पाहता येणार

पिंपरी चिंचवड : महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना सोमवारी (दि . 6) जाहीर झाली. प्रारूप प्रभाग रचनेवर घेतलेल्या 318 हरकती व सूचनांपैकी प्रभागाच्या हद्दीबाबत 22 सूचना व हरकती पूर्णतः मान्य करण्यात आले आहेत. तर 3 अंशतः मंजूर केल्या आहे. प्रभागाच्या व्याप्ती आणि वर्णनाबाबत आलेल्या तीन सूचना मंजूर करत अंतिम प्रभाग रचनेला मान्यता देण्यात आलेली आहे.

महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने एप्रिलमध्ये दिला. त्यानंतर चार सदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे निवडणूक घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार प्रभाग रचना तयार करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या निवडणूक विभागाला दिला. त्याप्रमाणे प्रशासनाने ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा तयार करून राज्य नगरविकास विभागाला सादर केला होता. नागरिकांच्या हरकती व सूचनांसाठी तो २२ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला. त्यावर चार सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना मागवल्या होत्या. प्रभाग रचना २०१७ प्रमाणेच असल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला. मात्र, तरीही ३१८ हरकती व सूचना नोंदवल्या गेल्या आहेत. त्यावर सुनावणी होऊन नगरविकास विभागाला प्रारूप प्रभाग रचना अंतिम मान्यतेसाठी पाठवली. चार ते सहा ऑक्टोबर दरम्यान दिलेल्या अंतिम मुदतीमध्ये शेवटच्या दिवशी या अंतिम प्रभाग रचनेला मान्यता देण्यात आलेली आहे.

असे आहेत बदल

प्रारूप प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक 1 मध्ये समाविष्ट असलेली ताम्हाणे वस्ती आता अंतिम प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक 12 मद्ये समाविष्ट करणेत आली आहे .प्रारूप प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक 6 मधील गावजत्रा मैदान आणि मनपा हॉस्पिटल इत्यादी भाग अंतिम प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक 7 मध्ये समाविष्ट करणेत आला आहे प्रारूप प्रभाग रचनेत प्रभाग 24 मधील म्हातोबा वस्ती चा भाग अंतिम प्रभाग रचनेत प्रभाग 25 मध्ये समाविष्ट करणेत आला आहे. प्रभाग रचनेमध्ये अन्य कोणताही बदल नाही असे निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.

प्रारूप प्रभाग रचनेवर 318 हरकती आणि सूचना घेण्यात आल्या होत्या मात्र किरकोळ स्वरूपात यावर दखल घेण्यात आली आहे. प्रभागांच्या नाव आणि व्याप्ती संदर्भात आलेल्या सूचनानुसार प्रभाग क्रमांक दहा येथील अण्णासाहेब मगर नगर, टिपू सुलतान नगर, बी.एस.एन.एल. परिसर एम.आय.डी.सी. ऑफीस चिंचवड या भागाचा समावेश प्रभाग क्रमांक १० मध्येच होता व आहे. परंतु “व्याप्ती” मध्ये त्यांचे नावाचा उल्लेख करणेत आला नव्हता. अंतिम प्रभाग रचनेच्या व्याप्तीमध्ये नावाचा उल्लेख करणेत आला तो करणेत आला आहे.प्रभाग क्रमांक ११ भिमशक्तीनगर या भागाचा समावेश प्रभाग क्रमांक ११ मध्येच होता व आहे. परंतु “व्याप्ती” मध्ये त्यांचे नावाचा उल्लेख करणेत आला नव्हता. अंतिम प्रभाग रचनेच्या व्याप्तीमध्ये नावाचा उल्लेख करणेत आला तो करणेत आला आहे.प्रभाग क्रमांक २६.वाकड या भागाचा समावेश प्रभाग क्रमांक २६ मध्येच होता व आहे. परंतु “व्याप्ती” मध्ये त्यांचे नावाचा उल्लेख करणेत आला नव्हता. अंतिम प्रभाग रचनेच्या व्याप्तीमध्ये नावाचा उल्लेख करणेत आला तो करणेत आला आहे

हेही वाचा –  विधीमंडळ सभागृह मंत्री, सदस्यांसाठी सुरक्षित नाहीत का? माणिकराव कोकाटे काय म्हणाले…

.पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार)
एकूण : १७,२७,६९२
अनुसूचित जाती : २,७३,८१०
अनुसूचित जमाती : ३६,५३५

प्रारूप रचनेतील उल्लेखनीय प्रभाग आणि लोकसंख्या

सर्वाधिक लोकसंख्येचा प्रभाग क्रमांक ९ : नेहरूनगर-मासुळकर कॉलनी : ५९,३९०

सर्वांत कमी लोकसंख्येचा प्रभाग क्रमांक ५ : भोसरी-गवळीनगर-चक्रपाणी वसाहत : ४९,०४९

सर्वाधिक अनुसूचित जाती लोकसंख्येचा प्रभाग १३ : निगडी-यमुनानगर : १५,७७०

सर्वांत कमी अनुसूचित जाती लोकसंख्येचा प्रभाग १५ : आकुर्डी प्राधिकरण : ३,३९१

सर्वाधिक अनुसूचित जमाती लोकसंख्येचा प्रभाग ४ : दिघी-बोपखेल : ४,२८६

सर्वांत कमी अनुसूचित जमाती लोकसंख्येचा प्रभाग १९ : एम्पायर इस्टेट चिंचवड स्टेशन : ३८९.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व ३२ प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाकडून आज मंजुरी देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेची अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रामध्ये आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच महापालिका मुख्यालय आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयात देखील प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

– अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, निवडणूक विभाग

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button