TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील 128 नगरसेवकांना ‘‘समान न्याय’’ : महापौर रवि लांडगे

सत्ताधारी भाजपाची सर्वसामावेशक भूमिका : पत्रकारांच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार!

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहर वाशी यांना दररोज पाणी पुरवठा करण्याबाबत पाऊले उचलली जातील. पाणी स्वच्छता आरोग्य यावर भर दिला जाईल असे प्रतिपादन नवनिर्वाचित महापौर रवी लांडगे यांनी केले.

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी रवी लांडगे, तर उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली. यानिमित्त पत्रकार परिषदेत महापौर लांडगे बोलत होते. महापौर पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा पत्रकारांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, पक्षनेते प्रशांत शितोळे, माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी नगरसेवक राजू दुर्गे उपस्थित होते.

स्वच्छ व सुंदर शहर कसे बनवता येईल याकडे आपले लक्ष असेल. सायकल शर्यतीच्या वेळी नागरिकांचा सहभाग आणि कर्मचाऱ्यांमधील जागरूकता यामुळे शहर सुंदर झाले होते तसेच सातत्य ठेवण्याचा प्रयत्न राहील असे महापौर लांडगे यांनी सांगितले.

प्रशासकीय काळामध्ये जी चुकीची कामे झाली, भ्रष्टाचार झाला त्यांची चौकशी करणार का असे विचारले असता प्रशासकीय काळातील निर्णयांबाबत मी माहिती घेईन. भ्रष्टाचाराबाबत माझ्यापर्यंत तरी काही माहिती आलेली नाही, असे महापौर लांडगे यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी स्वतंत्र आयुक्त नेमण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली जाईल असे महापौर लांडगे यांनी सांगितले. शहरात 128 नगरसेवक आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या तक्रारीची दखल घेण्याबाबत आयुक्तांना आदेश देण्यात येत असल्याचे महापौर लांडगे यांनी सांगितले. शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी आणखी यंत्रणा उभारली जाईल असे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button