Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोशी–चिखली परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मागणी

कारवाई न झाल्यास मोर्चा : सोसायटी फेडरेशनचा इशारा

पिंपरी- चिंचवड | प्रतिनिधी

मोशी प्राधिकरणातील सेक्टर ११ व १३ मधील उड्डाणपुलाखाली तसेच सीएनजी पंपालगत असलेल्या COEP कॉलेज रोडवरील मोठ्या प्रमाणातील अतिक्रमण तात्काळ हटवावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आठ दिवसांत कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

मोशी प्राधिकरणातील सेक्टर ११ व १३ मधील उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात हातगाड्या, टपऱ्या तसेच छोटे-मोठे हॉटेल्सचे अतिक्रमण झाले असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडी, अस्वच्छता आणि असुरक्षिततेचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

हेही वाचा     :          “आधुनिक पिंपरी-चिंचवडसाठी भाजपचे नवे सारथी सज्ज”: शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे

तसेच सीएनजी पंपालगत असलेल्या नियोजित शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या रस्त्यावर संध्याकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात हातगाड्या व भाजीविक्रेते बसत असल्याने नागरिकांना ये-जा करणे कठीण होत आहे. प्रभाग क्रमांक ८ आणि २ मधील रस्त्यांवरील सर्व अतिक्रमणे त्वरित हटवावीत, अशीही ठाम मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात क्रांती चौकातील अतिक्रमण हटवण्यासाठी ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाचे प्रभाग अधिकारी तथा अतिक्रमण विभाग प्रमुख श्री. अजिंक्य येळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष शिवराज लांडगे, फेडरेशनचे उपाध्यक्ष संदीप कुंभार, मैंदर्गी साहेब, संदीप तांदळे, टिळेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. आजच्या बैठकीत लवकरच आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून आयुक्तांसोबत बैठक घेऊन या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

मोशी–चिखली–पिंपरी परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि दैनंदिन अडचणींचा प्रश्न आम्ही अतिशय गांभीर्याने घेतला आहे. महानगरपालिकेने केवळ दिखाऊ कारवाई न करता सर्व अतिक्रमणे कायमस्वरूपी हटवावीत, ही आमची ठाम भूमिका आहे. नागरिकांना दिलासा मिळेपर्यंत फेडरेशनचा लढा सुरूच राहील.

– संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली–मोशी–पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button