विधायक उपक्रम: मराठवाड्यातील पूरग्रस्तांना दिलासा देणारा ‘‘एक हात मदतीचा’’
माजी नगरसेविका नम्रता योगेश लोंढे व सामाजिक कार्यकर्ते योगेश लोंढे यांचा पुढाकार! : आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वात ‘‘त्या’’ कुटुंबांची दिवाळी गोड

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
संकटाच्या काळात खऱ्या माणुसकीची ओळख पटते, आणि तीच ओळख इंद्रायणीनगर येथील माजी नगरसेविका नम्रता योगेश लोंढे आणि सामाजिक कार्यकर्ते योगेश लोंढे यांनी सिद्ध केली आहे. मराठवाडा आणि परिसरातील महापुराने उध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी लोंढे यांनी घेतलेला पुढाकार सध्या शहरातच नव्हे, तर राज्यभर कौतुकाचा विषय ठरत आहे.
भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढकाराने धारूर, अंबेजोगाई, लातूर, बीड, सोलापूर, नांदेड अशा ५० हून अधिक पूरग्रस्त गावांमध्ये मदतीचा हात पोहोचवण्यासाठी योगेश लोंढे यांच्या पुढाकाराने ५० ट्रक मदत साहित्य वितरीत करण्यात आले. या मदत किट्समध्ये तांदूळ, डाळ, पीठ, तेल, साखर, चहा, मसाले, मीठ, कांदे, बटाटे, फरसाण, बिस्किटे, मॅगी, ब्लँकेट्स, कपडे, औषधे अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा – राज्यात १५ ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज

मदतीच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतःचा सहभाग ठेवणारे माजी नगरसेविका नम्रता योगेश लोंढे व सामाजिक कार्यकर्ते योगेश यांनी या उपक्रमासाठी शहरभरातून स्वयंसेवक, तरुण मंडळी आणि सामाजिक संस्था यांचे सहकार्य मिळवले. एक एक साहित्याचे पॅकेज, वितरणाचे नियोजन, ट्रकची व्यवस्था ते मदत प्रत्यक्ष पोहोचवण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत लोंढे यांनी नेतृत्वाची भूमिका पार पाडली.

नांदेड जिल्ह्यातील बेग चिंचोली गावात भाजप आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ६५० कीटचे वितरण करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी योगेश लोंढे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. “पूरामुळे आम्ही होत्याचे नव्हते झाले. पण योगेश लोंढे आणि त्यांच्या टीमने दिलेल्या मदतीने आम्हाला नव्याने उभं राहण्याची ताकद दिली,” अशी भावना पूरग्रस्तांनी व्यक्त केली. योगेश लोंढे यांचं हे कार्य केवळ मदतीपुरतं मर्यादित न राहता, तरुणाईला सामाजिक जाणिवेची प्रेरणा देणारे आहे. “हे केवळ कर्तव्य नाही, तर माणुसकीचा धर्म आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या कार्यामागील प्रेरणा व्यक्त केली.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“मराठवाडा आणि परिसरातील पूरग्रस्तांना मदत करताना मला जाणवलं की ही मदत म्हणजे केवळ जीवनावश्यक वस्तू देणं नव्हे, तर त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आशेचं हास्य फुलवण्याचा एक प्रयत्न आहे. जेव्हा एखाद्याच्या घरातलं सगळं वाहून गेलं असेल, तेव्हा आपण दिलेला एक ब्लँकेट, एक कीट, एक पाठीवरचा विश्वासाचा हात त्यांच्या सगळ्यात मोठ्या आधाराचा स्तंभ ठरतो. ही मदत म्हणजे दान नव्हे – ही आपल्या माणसांच्या दुःखात, वेदनेत आणि संघर्षात सहभागी होण्याची एक जबाबदारी आहे. संकटात साथ देणं हे माझ्यासाठी केवळ सामाजिक कार्य नाही, तर माणुसकीचा धर्म आहे.”
– योगेश लोंढे, सामाजिक कार्यकर्ते, इंद्रायणीनगर.





