Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

“टीपी स्कीम”वरून कुदळवाडी, चिखली परिसरातील नागरिक आक्रमक

स्थानिकांकडून कागदपत्रांची होळी; ग्रामस्थ तीव्र आंदोलनाच्या भूमिकेत

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडीमध्ये दोन महिन्यांपूर्वी अतिक्रमण कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे 825 एकर जमिनीवर बुलडोझर फिरवण्यात आला. प्रदूषणाच्या आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यावर ही कारवाई झाली असल्याचे सांगण्यात आले आणि त्यानंतर लगेचच महापालिकेने टीपी स्कीम (शहर विकास आराखडा) राबवण्याच्या हालचाली सुरू केल्या. याबाबतचे जाहीर प्रकटनही देण्यात आले. मात्र याची माहिती लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थ यांना देण्यात आली नाही. ग्रामस्थांना अंधारात ठेवून नवीन शहर विकास आराखडा लादला जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी सोमवारी या टीपी स्कीमच्या जाहीर प्रकटन कागदपत्रांची होळी केली. ग्रामस्थांना विचारात न घेता टीपी लादला गेला तर आक्रमक भूमिका घेतली जाईल असेही ग्रामस्थांनी यावेळेस सांगितले.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये कुदळवाडी, चिखली आणि जाधववाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लघुउद्योजक व्यवसाय करत होते .त्या ठिकाणी भंगार मालाची गोदामे मोठ्या प्रमाणात होती. भंगार व्यवसायिकांमुळे शहरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. याशिवाय या भागात बांगलादेशी रोहिंगे असल्याचा संशयही वारंवार व्यक्त करण्यात आला. याबाबत ठोस कारवाई करणे गरजेचे आहे असा मुद्दा समोर आणल्यानंतर महापालिकेने अनधिकृत पत्रा शेड, गोदामे यांच्यावर कारवाई केली. कुदळवाडी, चिखलीगाव, जाधववाडी परिसरातील 825 एकर जमिनीवर बुलडोझर फिरवण्यात आला.

या कारवाईनंतर येथील व्यावसायिक स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली. मात्र प्रशासनाकडून अनधिकृत बांधकामनावर कारवाई केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आता महापालिकेने नगर रचना योजनेची जाहिरात प्रसिद्ध केली आणि “टीपी” च्या हालचाली सुरू झाल्या. यामुळे नागरिकांनी देखील आक्रमक भूमिका घेत. आराखड्याला विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात सोमवारी कुदळवाडी येथील विठ्ठल रुक्मिनी मंदिरात यासंदर्भात बैठक झाली. आणि “टीपी स्कीम”ला विरोध करण्यासाठी तीव्र जनआंदोलन उभारण्याचा निर्णय करण्यात आला.

हेही वाचा   :  To The Point : राष्ट्रवादीमधील संधीसाधु नेत्यांमुळे निष्ठावंताची ‘गळचेपी’ महेश लांडगेंना रोखणार कोण?

बैठकीसाठी भाजपचे युवा कार्यकर्ते दिनेश यादव, जेष्ठ उद्योजक बाळासाहेब यादव, लघुउद्योग संघटनेचे माजी अध्यक्ष तात्या सपकाळ, मराठा महासंघाचे उदय पाटील यांच्यासह युवराज पवार, दिलीप यादव, रमेश मोरे, दत्तूनाना मोरे, शैलेष मोरे, बाळासाहेब हरगुडे, गुलाबराव बालघरे, कोंडिबा यादव, विशाल बालघरे, कमालकर बालघरे, मनोज मोरे, दादासाहेब मोरे, गणेश यादव, नितेश मोरे, माऊली मोरे, सुदाम पवार, विशाल नेवाळे, तानाजी बालघरे, राहुल यादव, संभाजी यादव, दीपक ठाकूर, उत्तम बालघरे, किशोर बालघरे, जितेंद्र यादव, दिलीप मोरे, बाळासाहेब मोरे आदींसह सुमारे 300 हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.

महापालिकेच्या जाहीर प्रकटनाची होळी

आमचा जीव गेला तरी बेहत्तर पण “टीपी” होऊ देणार नाही, अशा अत्यंत कठोर शब्दांत ग्रामस्थांनी भावना व्यक्त केल्या. महापालिका प्रशासनाचा निषेध म्हणून टीपी स्किम बाबत महापालिकेने दिलेल्या जाहीर प्रकटनाची होळी यावेळी करण्यात आली.

ग्रामस्थांचे म्हणणे काय?

चिखली कुदळवाडीच्या जमिनी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणात गेल्या. महापालिकेच्या आरक्षणातही मोठे क्षेत्र गेले आहे. स्वस्त घरकूलासाठी १०० एकर क्षेत्र घेतले. यापूर्वीच या भागातील रस्त्यांसाठी देखील जमीन संपादित करण्यात आली. उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने कुदळवाडी चिखली परिसरातच जागा शिल्लक असताना अतिक्रमणांच्या नावाखाली कुदळवाडी आणि आसपासची अनेक गावातील जमिनीवर बुलडोझर फिरवला. आणि आता नवा शहर विकासा आराखडा माती मारून पुन्हा एकदा स्थानिकांच्या जमिनी ताब्यात घेण्याच्या प्रशासनाच्या हालचाली आहे मात्र यामुळे ग्रामस्थ देशोधडीला लागतील अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. कुठल्याही परिस्थितीत हा आराखडा आमच्यावर लाजू नका. अन्यथा ग्रामस्थ तीव्र आंदोलन उभारतील असा इशारा देखील देण्यात आला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button