ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवजयंतीनिमित्त रहाटणी व पिंपळे सौदागर परिसरातील वाहतुकीच्या व्यवस्थेत बदल

पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी २०२६ रोजी रहाटणी गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या‌ कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने त्या परिसरात वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. हा आदेश पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून जारी करण्यात आला आहे. कार्यक्रमादरम्यान सायंकाळी ५.०० ते रात्री ११.०० वाजेपर्यंत (अत्यावश्यक सेवांतील वाहने वगळता) सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध लागू असतील. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा – राज्यातील कंत्राटदारांची ७४ हजार कोटीची थकबाकी टप्याटप्याने देणार, अर्थसंकल्पात तरतूद

बदल करण्यात आलेले मार्ग पुढीलप्रमाणे :
रहाटणी फाटा चौकातून गोविंद चौकाकडे जाणाऱ्या सर्व जड व अवजड वाहनांना मनाई करण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग : काळेवाडी फाटा मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.
गोविंद चौकातून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक (रहाटणी गाव) बाजूकडे येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेशबंदी राहील.
पर्यायी मार्ग : गोविंद चौक ते कोकणे चौक मार्गे वळविण्यात येईल.
महादेव मंदिर/पिंपळे सौदागर पोलीस चौकी टी-पॉइंटकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.

पर्यायी मार्ग : महादेव मंदिर/पिंपळे सौदागर पोलीस चौकी येथून पी. के. चौक मार्गे वाहतूक वळविण्यात येईल.

जीवन ज्योती हॉस्पिटलजवळील टी-पॉइंटकडून पुतळा चौकाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेशबंदी राहील.
पर्यायी मार्ग : जीवन ज्योती हॉस्पिटलजवळील टी-पॉइंट ते पी. के. चौक मार्गे वाहतूक सुरू राहील.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे व दिलेल्या पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन पोलिस उपायुक्त (वाहतूक) यांनी केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button