दृष्टिहीन विद्यार्थ्यांसोबत लुटला बाल दिनाचा आनंद!
शिक्षण विश्व: मास्टर माइंड ग्लोबल स्कूलचा कौतुकास्पद उपक्रम

पिंपरी चिंचवड: बालदिनानिमित्त दृष्टिहीन विद्यार्थ्यांसोबत गप्पा, गोष्टी आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमातून बाल दिनाच्या मजेचा आनंद घेण्यात आला.
मास्टर माइंड ग्लोबल स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ.प्रदीपा नायर यांच्या पुढाकारातून भोसरी येथे बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी पताशिबाई लुंकड अंध विद्यालयातील दृष्टिहीन विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांना शुभेच्छा पत्र देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
दृष्टिहीन विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आणि कलागुणांनी उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी प्रेरणादायी विचार मांडत शारीरिक मर्यादा या यशाचे अडथळे नसतात असा संदेश दिला आणि सकारात्मकता तसेच मेहनतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
हेही वाचा – एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी ‘पंचसूत्री आराखडा’; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती….
शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य गीत नाटिका कविता आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण रंगवले. सर्व विद्यार्थ्यांना लाडूंचे वाटप करण्यात आले.
सहकार्याची भावना दृढ करणे महत्त्वाचे!
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक डॉ प्रदीपा नायर यांनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले आणि अशाप्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता सामाजिक बांधिलकी आणि सहकार्याची भावना दृढ करतात असे सांगितले.




