Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जातीय जनगणना निर्णयाचे पेढे वाटून स्वागत

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर पिंपरी चिंचवडमध्ये आनंदोत्सव

पिंपरी चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून भाजप सरकारने घेतलेल्या जातिनिहाय जनगणनेच्या निर्णयाबद्दल पंतप्रधानांचे जाहीर अभिनंदन करुन नागरिकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

भोसरी विधानसभा मतदारसंघांतर्गत धावडेवस्ती, इंद्रायणीनगर, नेहरूनगर मंडलाच्या वतीने भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने घेतलेला जातनिहाय जनगणनेचा निर्णय ऐतिहासिक असून काँग्रेसने अनेक वर्ष जातनिहाय जनगणनेची मागणी मान्यता न करता केवळ राजकारण केले. पण पंतप्रधानांनी जातनिहाय जनगणनेला मान्यता दिली. यामुळे सामाजिक न्यायाचे नवीन पर्व सुर झाले आहे. अशा भावना मंडल अध्यक्ष शिवराज लांडगे यांनी मानल्या.

हेही वाचा –  सोमवारी जाहीर होणार बारावीचा निकाल, कुठल्या वेबसाईटवर पाहता येणार निकाल?

कार्यक्रमासाठी कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत लांडगे,शहर सरचिटणीस संजय मांगोडेकर, माजी नगरसेवक विलास मडिगेरी, राजेंद्र लांडगे, योगेश लोंढे माजी शिक्षण मंडळ सभापती अर्जुन ठाकरे, माजी स्वीकृत सदस्य वैशाली खाडे, अल्पसंख्य शहराध्यक्ष फारुकभाई इनामदार, विना सोनवलकर, आशा काळे, गीता महेंद्रु, वंदना आल्हाट, धनंजय लांडगे, बाबुराव लोंढे, कुंदन काळे, संदेश साळुंखे, मंगेश कुलकर्णी आदी उपस्थित होते .

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button