भाजप नगरसेवक रवी लांडगे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट
शहराच्या विकासाबाबत सविस्तर चर्चा; विकासाचा आलेख उंचावता ठेवण्याची ग्वाही

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 मधून बिनविरोध निवडून आलेले भाजपचे नगरसेवक रवी लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाबाबत सविस्तर चर्चा झाली.
यावेळी रवी लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा आलेख कायम उंचावता ठेवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांना दिली. शहरातील पायाभूत सुविधा, नागरी सोयीसुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील विकासकामांना अधिक गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – कृषी योजनांचा निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करा केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे राज्यांना निर्देश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिनविरोध निवडीबद्दल रवी लांडगे यांचे अभिनंदन केले आणि पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिक, शैक्षणिक आणि आयटी क्षेत्रात राज्यातील महत्त्वाचे केंद्र असल्याचे नमूद केले. शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे, असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीत आगामी काळातील विकास प्रकल्प, महापालिका व राज्य सरकार यांच्यातील समन्वय आणि नागरिकाभिमुख प्रशासन याबाबतह चर्चा झाली. पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रगतीसाठी राज्य सरकारच्या धोरणांशी सुसंगत काम करत राहण्याचा निर्धार मी व्यक्त केला आहे.
– रवी लांडगे,नगरसेवक प्रभाग क्रमांक 6 भोसरी.




