ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रभाग क्र. १० मध्ये भाजप उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद

मिशन- PCMC: विकासकामांवर नागरिकांचा विश्वास

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना नागरिकांकडून उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विकासकामांचा ठोस अनुभव आणि विश्वासार्ह नेतृत्वामुळे नागरिकांचा कल भाजप उमेदवारांकडे वाढताना दिसत आहे.

भारतीय जनता पार्टीने प्रभाग क्रमांक १० मधून एक जागा बिनविरोध जिंकली असून उर्वरित तीन जागांसाठी सर्वसामान्य कुटुंबातून आलेले, कामाशी जोडलेले आणि जनतेच्या प्रश्नांशी थेट संबंधित उमेदवार दिल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. हा निर्णय म्हणजे जनतेच्या अपेक्षांना दिलेले योग्य उत्तर असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून घरभेटी, पदयात्रा आणि थेट संवादाच्या माध्यमातून उमेदवार नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. प्रचारादरम्यान प्रभागात यापूर्वी झालेल्या विविध विकासकामांचे नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे. त्याचबरोबर रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, वीज, कचरा व्यवस्थापन आदी दैनंदिन प्रश्न व प्रलंबित तक्रारी नागरिक थेट उमेदवारांसमोर मांडत आहेत.

हेही वाचा       :            प्रभाग ५ मध्ये ‘अजित भाऊ गव्हाणे’ यांच्या शिलेदारांची बाजी; घराघरांत पोहोचतोय विकासाचा अजेंडा!

दरम्यान, आमदार अमित गोरखे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून प्रभाग क्रमांक १० साठी विकासनिधीतून लहान मुलांसाठी सुरक्षित ‘मॅट प्ले-ग्राउंड’ उभारणीस मंजुरी मिळाल्याने नागरिकांमध्ये विशेष समाधान व्यक्त केले जात आहे. बालकांच्या सुरक्षित खेळासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा निर्णय विकासाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे नागरिकांचे मत आहे.

“फक्त आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष काम” ही भारतीय जनता पार्टीची ओळख असून, आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक १० मध्ये विकासाची गती अधिक वेगाने वाढेल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

प्रभाग क्रमांक १० मधील प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजा, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकास हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. नागरिकांनी दाखवलेला विश्वास आम्ही प्रामाणिकपणे विकासकामांतून उतरवू. शब्दांपेक्षा कामातूनच उत्तर देत, हा प्रभाग अधिक सक्षम, स्वच्छ आणि सुरक्षित करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.

– अनुराधा गोरखे, उमेदवार, भाजपा, प्रभाग- 10.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button