Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी मतदार संघात आण्णा बनसोडेंना विक्रमी मतांनी निवडून आणा!

मिशन विधानसभा : आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे आवाहन

पिंपरी-चिंचवड | पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे हे अत्यंत सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्यासाठी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी काम करावे, अशा सूचना आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिल्या.

आरपीआय शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश तरस, भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी खासदार अमर साबळे, अजिज शेख, बाळासाहेब भागवत, चंद्रकांता सोनकांबळे, सुजाता पालांडे, सिकंदर सूर्यवंशी, राजेंद्र कांबळे, कमल कांबळे, विकास गाडे, इला ठोसर, अंकुश कानडे, दुर्गाप्पा देवकर, रामचंद्र माने, मारुती जकाते, दयानंद वाघमारे, रत्नमाला सावंत, नवनाथ डांगे, अंकुश कानडे आदी उपस्थित होते.

महायुतीच्या पाठीमागे उभा आहे आरपीआयचा गडी, मग का येणार नाही अण्णा बनसोडे यांची घडी, अशा आपल्या खास कवितेच्या शैलीत रामदास आठवले यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. ते पुढे म्हणाले, राहुल गांधी चुकीच्या पद्धतीने मांडणी करून मत मागत आहेत. ही पद्धत चुकीची आहे. आम्ही संविधानाला डाग लागू देणार नाही. देशाला अखंड ठेवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप मेहनत घेतली आहे. ती आम्ही वाया जाऊ देणार नाही.

चंद्रकांता सोनकांबळे या मतदार संघात इच्छुक होत्या. त्यांच्यासह काहींनी अर्ज दाखल केले होते. पण माझा पक्ष हा शिस्तीचा पक्ष आहे. मी सांगितल्यानंतर सोनकांबळे यांनी अर्ज माघारी घेतला. त्या अनेक वर्षांपासून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. पिंपरी चिंचवड शहराच्या प्रत्येक वस्तीशी माझा संबंध आहे. अनेक प्रश्नांसाठी आपण सरकारसोबत काम करत आहोत.

हेही वाचा     –      ‘मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला पण..’; देवेंद्र फडणवीस 

आरपीआय पक्ष मोठा करायचा आहे : रामदास आठवले

भारतात काँग्रेस आणि आरपीआय हे दोनच पक्ष असावेत अशी बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा होती. आता आरपीआय पक्ष आपल्याला मोठा करायचा आहे. मणिपूर, नागालँड येथे आपली ताकद वाढत आहे. अंदमान निकोबार, लक्षद्वीप येथेही माझा पक्ष असून विदेशात देखील अनेकजण काम करण्यास इच्छुक असल्याचेही आठवले म्हणाले.अमर साबळे म्हणाले, देशपातळीवरील निर्णयात रामदास आठवले यांचे मत महत्वाचे असते. आरपीआयचा महापालिका निवडणुकीत योग्य सन्मान केला जाईल. त्यासाठी आम्ही काम करणार आहोत. या निवडणुकीत आरपीआयचे योगदान खूप महत्वाचे आहे.

महापालिका निवडणुकीत न्याय मिळावा…

चंद्रकांता सोनकांबळे म्हणाल्या, आठवले यांची सभा व्हावी अशी आमदार अण्णा बनसोडे यांची ईच्छा होती. मात्र वेळेअभावी ते शक्य नसल्याने ते पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आले. पिंपरीची जागा आरपीआयने मागितली होती. मात्र ती मिळाली नाही. पुढील काळात आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांना चांगल्या जागी काम करण्याची संधी मिळेल असे आश्वासन मिळाले आहे. आपल्या पक्षाचे प्रतिनिधी विधानसभेत असायला हवेत. आगामी निवडणुकीत आरपीआयला चांगल्या जागा मिळायला हव्यात. महापालिका निवडणुकीत आम्हाला न्याय मिळाला पाहिजे.

आमदार बनसोडे यांनी मानले आभार…

आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, रामदास आठवले माझ्या प्रचारासाठी आले याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. चंद्रकांता सोनकांबळे यांनी माझ्यासाठी मोठा त्याग केला आहे. आरपीआयने मला कायम साथ दिली आहे. जेवढं प्रेम अजित दादांनी केलं, तेवढंच प्रेम रामदास आठवले यांनी दिले. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आगामी निवडणुकीत आरपीआयला योग्य सन्मान मी देणार आहे. महापालिकेत आरपीआयचे खाते उघडणार हे नक्की, असा विश्वास बनसोडे यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button