Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डी वाय पाटील संकुलात स्टार्टअपचा महाकुंभ; ‘बिझ टँक’ स्पर्धेत ३० निवडक स्टार्टअप्स भिडणार!

पिंपरी चिंचवड  : देशभरातील तरुण उद्योजकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि स्टार्टअप संस्कृतीला बळ देण्यासाठी, डी वाय पाटील पीजीडीएम इन्स्टिट्यूट (आकुर्डी), डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि वायरर सोल्युशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बिझ टँक २०२६’ या राष्ट्रीय स्तरावरील व्यवसाय कल्पना पिचिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी आकुर्डी येथील शांताई सभागृहात पार पडणार आहे.

​या स्पर्धेला संपूर्ण भारतातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शेकडो प्रवेशिकांमधून ३० अत्यंत नाविन्यपूर्ण व्यवसाय कल्पनांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. हे तरुण उद्योजक दिग्गज गुंतवणूकदार, उद्योगपती आणि स्टार्टअप मार्गदर्शकांसमोर आपल्या व्यवसायाचे मॉडेल सादर (Pitch) करतील.

​ आकर्षक रोख बक्षिसे आणि इनक्युबेशनची संधी

​विजेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे:
​प्रथम क्रमांक: ५०,००० रुपये
​द्वितीय क्रमांक: २५,००० रुपये
​तृतीय क्रमांक: १५,००० रुपये
​केवळ बक्षीसच नव्हे, तर सर्वोत्तम कल्पनांना डी वाय पाटील शैक्षणिक संकुलातील ‘ज्ञानसागर इनक्युबेशन केंद्रात’ प्रत्यक्ष व्यवसाय उभारणीसाठी तांत्रिक मदत, मार्गदर्शन आणि स्टार्टअप सपोर्ट देखील दिला जाणार आहे.

हेही वाचा –  ‘एमपीएससी’ने ‘ऑप्टिंग आऊट’ पसंतीक्रमाचा पर्याय नाकारला; विद्यार्थ्यांचा प्रचंड गोंधळ, अनेकांची संधी हुकणार…

​ दिग्गजांची उपस्थिती

​या सोहळ्याला स्टार्टअप क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. यात बांबू इंडियाचे संस्थापक योगेश शिंदे, उद्योजक डॉ. रवींद्र मिनियार, अ‍ॅमडॉक्सचे संचालक रवींद्र पाल सिंग, पारटेक्स एआयचे गौरव त्रिपाठी आणि तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉ. कविता पारेख यांचा समावेश आहे. तसेच भावेश व्होरा, गिरीश साळुंखे, कुशल पिट्टी यांसारखे प्रतिष्ठित गुंतवणूकदार परीक्षकाची भूमिका बजावणार आहेत.

​आयोजन आणि सहकार्य

​डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री. तेजस पाटील, कॅम्पस डायरेक्टर रिअर अ‍ॅडमिरल अमित विक्रम (निवृत्त), संचालिका डॉ. शलाका पारकर, प्राचार्य डॉ. पी. मालती आणि वायरर सोल्युशन्सचे सीईओ श्री. हिरेन केसरिया यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. रश्मी प्रसाद, श्री. आशिष राऊत आणि श्री. कल्पेश कुवर हे या स्पर्धेचे यशस्वी संयोजन करत आहेत.
​पुढच्या पिढीतील व्यावसायिक नेत्यांना प्रेरणा देणारा हा ‘बिझ टँक २०२६’ सोहळा स्टार्टअप इकोसिस्टममध्ये मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button