Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी- चिंचवडमध्ये वीज सुविधा सक्षमीकरणस “बूस्टर डोस”

महावितरण प्रशसनाकडून 291 कोटी रुपयांचा विकासासाठी आराखडा मंजूर

भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

पिंपरी- चिंचवड | प्रतिनिधी

भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला मोठी गती देणारा ऐतिहासिक निर्णय घेत महावितरण प्रशासनाने 291.52 कोटींच्या शहर विकास आराखडा योजनेला मंजुरी दिली आहे. त्यासाठी पावर डिस्ट्रीब्यूशन इनहान्समेंट प्रोग्राम अंतर्गत निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

विशेषतः चिखली– मोशी– चऱ्होली या झपाट्याने विकसित होत असलेल्या ‘रेसिडेन्सीअल कॉरिडोर’ साठी पुढील 10 वर्षांच्या वीज पायाभूत सुविधांना हा प्रकल्प मोठा “बूस्टर डोस” ठरणार आहे.

पिंपरी- चिंचवडमध्ये वेगाने वाढणारे निवासी प्रकल्प, नवीन टाउनशिप, आयटी व औद्योगिक विस्तार आणि सातत्याने वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता भविष्यातील वीज गरजांचा सखोल अभ्यास करून हा विस्तृत DPR तयार करण्यात आला आहे. या योजनेमुळे भोसरी विधानसभा मतदारसंघातील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक, विश्वासार्ह आणि भविष्योन्मुख होणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फंडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार महेश लांडगे यांनी महावितरण सुविधा सक्षम करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. विधानसभा अधिवेशनात केलेला प्रभावी पाठपुरावा आणि नाशिक येथे होणारा कुंभमेळाच्या निमित्ताने महावितरण इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीला गती मिळालेली आहे.

सध्या भोसरी विभागात 4 लाख 58 हजारांहून अधिक ग्राहक असून, वाढत्या वीज मागणीमुळे विद्यमान यंत्रणेवर मोठा ताण निर्माण होत आहे. अनेक भागांमध्ये ओव्हरलोडिंग, व्होल्टेज फ्लक्चुएशन आणि तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने भविष्यातील गरज ओळखून ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे.

हेही वाचा

पुणे आणि पिंपरी-चिंचवड हादरले! विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू

10 नवीन उपकेंद्र..!

या प्रकल्पांतर्गत 10 नवीन उपकेंद्रे, 220 किलोमीटर उच्चदाब वीजवाहिन्या, 150 किलोमीटर लघुदाब वीजवाहिन्या, 100 नवीन रोहित्रे, 128 रोहित्र क्षमता वाढ, 105 RMU, 160 फीडर पिलर तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वीज वितरण सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे चिखली, मोशी, चऱ्होली, दिघी आणि MIDC परिसरातील भविष्यातील वाढती निवासी व औद्योगिक वीज मागणी सक्षमपणे पूर्ण करता येणार आहे. विशेष म्हणजे, या योजनेमुळे नागरिकांना अधिक दर्जेदार, अखंडित आणि विश्वासार्ह वीजपुरवठा उपलब्ध होणार असून वीज खंडित होण्याचे प्रमाण कमी होईल. तांत्रिक बिघाड झाल्यास प्रभावित भाग त्वरित वेगळा करून कमी वेळेत वीजपुरवठा पूर्ववत करता येणार आहे. तसेच Technical Loss आणि AT & C Loss कमी होऊन संपूर्ण वीज वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षम होणार आहे.

नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी निर्णायक पाऊल..

मोशी–चिखली–चऱ्होली हा परिसर पुणे शहराच्या भविष्यातील सर्वात मोठ्या Residential Growth Corridor म्हणून वेगाने विकसित होत आहे. हजारो नवीन घरे, टाउनशिप, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स, व्यावसायिक संकुले आणि उद्योग येथे उभे राहत आहेत. अशा परिस्थितीत पुढील दशकाचा विचार करून उभारण्यात येणारी ही वीज पायाभूत सुविधा भविष्यातील विकासाचा मजबूत पाया ठरणार आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघाला “Future Ready Electricity Infrastructure” देणारा हा प्रकल्प केवळ वीज योजनेपुरता मर्यादित नसून, पुढील अनेक वर्षांसाठी नियोजित शहरी विकास, गुंतवणूक, उद्योगवाढ आणि नागरिकांच्या जीवनमान उंचावण्यासाठी निर्णायक पाऊल मानला जात आहे.

“भोसरी विधानसभा मतदारसंघातील वेगाने वाढणारी लोकसंख्या, नवीन टाउनशिप, उद्योग आणि निवासी प्रकल्प लक्षात घेता भविष्यासाठी सक्षम वीज पायाभूत सुविधा उभारणे ही काळाची गरज होती. महावितरण प्रशासनाने 291 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला आहे. त्यासाठी पावर डिस्ट्रीब्यूशन इनहान्समेंट प्रोग्राम अंतर्गत निविदा प्रक्रियासुद्धा राबविलेली आहे. यामुळे चिखली–मोशी–चऱ्होलीसह संपूर्ण परिसराला मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेमुळे नागरिकांना अधिक दर्जेदार, अखंडित आणि विश्वासार्ह वीजपुरवठा मिळेल, तसेच भविष्यातील औद्योगिक व निवासी विकासालाही मोठी चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी मतदारसंघाला ‘Future Ready Electricity Infrastructure’ बळकट करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.

– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी- चिंचवड, पुणे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button