breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पुणे शहरातील सर्व गुन्हेगारांची परेड; गजा मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळची हजेरी

पुणे | पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारीची पाळेमुळे उघडण्यास सुरुवात केली आहे. पोलीस आयुक्तालय मध्ये मंगळवारी त्यांनी पुणे शहरातील सर्व टॉप मोस्ट गॅंग आणि गँगस्टर्स आणि त्यांचे सर्व सहकारी गुन्हेगार यांची परेड घेतली.

पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी जवळपास दोनशे ते तीनशे गन्हेगारांना आज पोलीस आयुक्तालयामध्ये हजर करण्यात आलं आहे. आगामी निवडणुकीच्या आधी कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आयुक्तांनी सर्व अट्टल गुन्हेगारांची ओळख परेड केली. पुणे शहरातील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगारांवर ज्यांच्यावर गुन्ह्यांची नोंद आहे त्यांना सर्वांना पोलीस आयुक्तालयामध्ये बोलावण्यात आलंय.

हेही वाचा     –    ‘गाव चलो अभियान’ पं. दिनदयाळ उपाध्याय यांना समर्पित 

कुख्यात गजानन मारणे, नीलेश घायवळ, बाबा बोडके, बंडू आंदेकर, टिपू पठाण, कंचीले अशा प्रमुख १५ गुन्हेगारी टोळ्यांसह नव्या उभरत्या ५० टोळ्यांतील सुमारे २६७ अधिक सराईत गुन्हेगारांना परेडसाठी पोलिस आयुक्तालयात हजेरीसाठी बोलावण्यात आले होते.

पुणे शहरातील कायम चर्चेत असलेले गजानन मारणे, बाबा बोडके, जंगल्या सातपुते आणि निलेश घायवळ हे मोठे गुन्हेगार उपस्थित होते. यामधील काही गुन्हेगार हे जामिनावर बाहेर आहेत तर काही प्रकरणांची चौकशी सुरू आहे अशा सर्वांना उपस्थित राहण्यासाठी सांगितलं होतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशत पसरवण्याचा वापर करू नये, अशा सूचना पोलिसांनी या गुंडांना दिल्या गेल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button