breaking-newsTOP Newsपुणे

पुणे शहरातील नवीन निर्बंध : महापालिका प्रशासनाचे आदेश वाचा!

पुणे । प्रतिनिधी

पुणे शहरातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता पुणे महापालिका प्रशासनाकडून पुणे शहरात नव्याने निर्बंध वाढविण्यात आले असून सर्व प्रकारच्या सांस्कृतिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

हे आहेत अत्यंत महत्वाचे नवे आदेश

■ पुणे महानगरपालिका क्षेत्रात सर्व प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमास पुढील आदेशापर्यंत संपूर्ण प्रतिबंध राहील.

■ लग्नसमारंभ कार्यक्रम ५० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील.

अंत्यसंस्कार दशक्रिया व त्या निगडित कार्यक्रम २० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील.

■ पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कार्यालय (आरोग्य व अत्यावश्यक सेवा वगळून) ५० टक्के मनुष्यबळासह सुरू ठेवता येतील. शक्य असल्यास ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय निवडावा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button