breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

‘माझ्या वडिलांनी कोणाला फसवलेलं नाही’; नितीन दासाईंच्या मुलीची प्रतिक्रिया

मुंबई : कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. एडलवाईज कंपनीवर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नितीन देसाई यांच्या मुलीने प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या वडिलांनी कोणालाच फसवलेलं नाही, असं मानसी देसाई हिने म्हटलं आहे.

नितीन देसाई यांनी मुलगी मानसी देसाई म्हणाली, माझ्या वडिलांनी कोणालाही फसवलेलं नाही. त्यांचा तसा प्रयत्नही नव्हता. कोरोनामुळे व्यवसायावर परिणाम झाला. त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला त्यामुळे पैसे थकले. तसेच एडलवाईज कंपनीने वडिलांना खोटी आशा दाखवली, माझ्या वडिलांनी खूप मेहनत करून त्यांचं नाव कमावलं आहे ते मातीत मिळवू नका.

हेही वाचा – ‘आमदार रत्नाकर गुट्टे मेले तरी..’; महादेव जानकर यांचं विधान चर्चेत

नितीन देसाईंनी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय म्हटलं?

नितीन देसाई यांनी आत्महत्या करण्यापुर्वी काही ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केल्या होत्या. त्याचा तपशील आता समोर आला आहे. एडेलवाईज कंपनीचे अध्यक्ष रशेष शाह आणि अन्य तीन जणांवर देसाईंनी गंभीर आरोप केले आहेत. रशेष शाहनं माझा स्टुडिओ गिळण्याचं काम केलं, स्मित शहा, केयुर मेहता, आर. के. बन्सल यांनी माझा स्टुडिओ लुटला, असं देसाईंनी ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button