breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

जर्सीसाठी ७ हा क्रमांक का निवडला? महेंद्रसिंग धोनीने सांगितले कारण..

MS Dhoni | जगभरात कॅप्टन कूल अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंग धोनीला भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने तिन्ही आयसीसी चषक उंचावली आहेत. दरम्यान, धोनीने एका कार्यक्रमात जर्सीसाठी ७ हा क्रमांक का निवडला यामागचं कारण स्पष्ट केलं आहे.

महेंद्रसिंग धोनी म्हणाला की, मी पृथ्वीवर पाऊल ठेवण्यासाठी माझ्या आई-वडिलांनी ७ जुलै १९८१ हा दिवस ठरवला होता. मी सातव्या महिन्यातील सातव्या दिवशी जन्मलो. १९८१ हे वर्ष होतं. ८ मधून १ हा अंक वजा केला तर ७ हे उत्तर येतं. म्हणून मी ७ नंबरची जर्सी निवडली. जेव्हा मला विचारण्यात आलं की, तू कुठल्या क्रमांकाची जर्सी परिधान करणार? तेव्हा जर्सीचा क्रमांक ठरवणं माझ्यासाठी खूप सोपं होतं, असं तो म्हणाला.

हेही वाचा     –        ‘वारकरी शिक्षण संस्थेसाठी ५ कोटींचा निधी देणार’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

धोनीने जर्सीसाठी ७ हा क्रमांक का निवडला यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. यानंतर धोनीच्या चाहत्यांनी ७ या नंबरवकरून थाला फॉर द रीजन हा ट्रेंड चालवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button