शरद पवारांचा उत्तराधिकारी ठरला? पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याने वेधलं सर्वांचे लक्ष

पुणे : राज्यात पुन्हा एकदा राजकीय भुकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तारधिकाराची चर्चा राज्याच्या राजकीय गोटात रंगली होती. अशातच आता, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उत्तराधिकारीची चर्चा जोरदार रंगली आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवार यांनी स्वतःच अप्रत्यक्षपणे त्यांच्या उत्ताराधिकारी वर भाष्य केलं आहे.
एका इंग्रजी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी मनातील अनेक गोष्टी स्पष्टपणे बोलून दाखवल्या आहेत. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावाचा उल्लेख करत सर्वांचे लक्ष वेधलं आहे.
राज्यात दोन्ही राष्ट्रवादीमध्ये फुट पडली असली तरी अनेक दोन्ही गटातील नेतेमंडळीमध्ये एकत्र येण्याची भावना आहे. याबद्दल अनेकांनी ही भावना उघडपणे बोलूनदेखील दाखवली आहे. अशातच, दोन्ही गट एकत्र येण्याच्या निर्णयावर भाष्य करताना शरद पवार यांनी ही जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर सोपवली आहे. तर पक्ष बदलातील जबाबदारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या खांद्यावर दिली आहे.
हेही वाचा – एआय तंत्रज्ञानावर आधारित सीसीटीव्ही लवकरच कार्यान्वित, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
त्यामुळं राज्याच्या राजकारण्यांमध्ये शरद पवारांचा उत्तराधिकारी ठरला अशी कुजबूज सुरु झाली आहे. पण शरद पवार उत्तराधिकारी म्हणून सुप्रिया सुळे की जयंत पाटील नेमकं कोणाचं नाव जाहिर करतील याकडे आता सर्वांचे लक्ष वेधलं आहे.
भविष्यात एकत्र यायचं की नाही? हे राष्ट्रवादीच्या नव्या पिढीतील नेतृत्वाने ठरवावे. मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून काहीसा बाजूला झालो आहे.एकत्र येण्यासंदर्भात अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी बसून ठरवावं. पक्ष उभा करताना आज बाजूला गेलेलं सगळे एकत्र होते त्यांच्या सगळ्यांची विचारधारा एकचं आहे. त्यामुळे भविष्यात जर हे सगळे एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही. माझे सगळे खासदार एक मताचे आहेत, आमदारामध्ये अस्वस्थता असू शकते. मी निर्णय प्रक्रियेपासून खूप लांब आहे. पक्षात भाकरी फिरवण्याचा निर्णय हा जयंत पाटलांनी घ्यावा, असंही शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.
शरद पवारांचा उत्तराधिकारी कोण अशी चर्चा सुरु झाली की सुप्रियाताई दिल्लीत आणि अजित पवार राज्यात अशी वाटणी होईल अशा वावड्या उठायच्या. पण जेव्हा शरद पवार यांन निवृ्त्तीची घोषणा केली होती तेव्हा पवारांची उत्तराधिकारी म्हणून सुप्रिया सुळे यांचे नाव समोर आले होते. शरद पवारांच्या कन्या म्हणूनही पवारांच्या राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.