महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थानने घेतला मोठा निर्णय!

नाशिक | उद्या महाशिवरात्री निम्मित बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. अशातच आता मंदिर समितीने एक मोठा निर्णय घेतला आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिर बुधवारी पहाटे चारपासून गुरूवारी रात्री नऊपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे. त्यासाठी पूर्व दरवाजा दर्शनबारीतून भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे.
हेही वाचा : ‘नमो किसान सन्मान निधी योजनें’तर्गत ३ हजार रुपये वाढविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
याशिवाय भाविकांची होणारी गर्दी पाहता देवस्थानच्यवतीने ऑनलाईन दर्शन, देणगी दर्शन बंद ठेवण्यात आले आहे, त्यामुळे आता भाविकांना नियमानुसारच दर्शनच घ्यावे लागणार आहे.
तसेच महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांच्या वतीने बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
यापार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महाशिवरात्र काळात भाविकांची होणारी गर्दी पाहता गर्भगृह दर्शन बंद ठेवण्यात आले आहे.