Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

एक्स्प्रेस वेवर पुन्हा दोन तास कोंडी; खालापूर टोलनाक्यापासून बोरघाटापर्यंत 12 किमी रांगा, वाहतूक नियोजनावर संताप

पुणे : मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर गेल्या दोनच दिवसांपूर्वी तब्बल 31 तासांची भीषण वाहतूक कोंडी झाल्यानंतर, वाहतूक आता सुरळीत सुरु राहील असा विश्वास महामार्ग वाहतूक पोलीस देत असतानाच आज (शुक्रवार) पून्हा एकदा वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने दोन तासांच्या या वाहतूक कोंडीने वाहन चालक व प्रवासी पून्हा हैराण झाल होते. त्यामुळे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक नियंत्रणाच्या गलथान कारभाराबाबत सर्वांनीच संताप व्यक्त केला.

शनिवार-रविवारच्या सुट्ट्यामुळे वाहनांची संख्या मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर आज वाढली.त्यामुळे महामार्ग वाहतूक पोलीसांनी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी मुंबई लेनवर ब्लॉक घेतला आहे.

हेही वाचा –  ओला-उबेर-रॅपिडो चालकांच्या संपावर मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या मालकांवर…

पुण्याकडील वाहतूक मुंबई लेनवरुन वळवून वाहनांची गर्दी कमी केली जात आहे. तर एक्स्प्रेस वेवर झालेली वाहतुक कोंडी लक्षात घेऊन आता अवजड वाहने रोखण्याचे काम पोलीसांनी सुरू केले आहे. पुण्याच्या दिशेने जाणारी अवजड वाहने बाजूला थांबविण्यात आल्याने घाट परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत झाली.

प्रोपेलीन गॅस टँकर अपघातामुळे विस्कळीत झालेली मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक 5 फेब्रुवारी रोजी गुरुवारी सुरळीत झाली. त्यामुळे शुक्रवारी पहाटेपासून मुंबईत अडकून पडलेले प्रवासी व अन्य वाहने मोठ्या संख्येनी पुण्याच्या दिशेने निघाले, त्यामुळे पुणे लेनवर खालापूर टोल नाक्यापासून बोरघाटातील अमृतांजन ब्रीजपर्यंतच्या परीसरात वाहनांच्या 10 ते 12 किमी अंतराच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी झाल्याने प्रवासी व वाहन चालक हैराण झाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button