Breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

“जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी…”; अजित पवारांनी तीन शिफ्टमधील सांगितले सरकारचे कामकाज

Ajit Pawar :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र या इमारतीचा भूमिपूजन सोहळा पार पडला. याशिवाय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत नव्या 20 दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अजित पवार यांनी जम्मू-कश्मिरमधील पहलगाममधील हल्ल्याबाबत भाष्य केले. तसेच सरकार 24 तास कार्यरत असलेल्या वेळापत्रकाची माहिती दिली.

“पहलगाममध्ये जी घटना घडली यामध्ये संपूर्ण भारत अक्षरशः बदला घेतला पाहिजे, त्यांची जागा दाखवली पाहिजे, निष्पक लोक जातात, भ्याड हल्ले होतात. पंतप्रधानांनी काही निर्णय घेतले आहेत, अशा गोष्टी होता कामा नये. ज्याच्या डोक्यातून हे सगळं आलं त्याला आपली भारतीय सेना सोडणार नाही याचा मला विश्वास आहे,” असे अजित पवारांनी म्हटले.

अजित पवारांनी या कार्यक्रमात बोलताना आमचे सरकार 24 तास जनतेच्या सेवेत असल्याचे सांगितले. “मी पहाटे 4 वाजता उठतो, फिरतो, व्यायाम करतो आणि कामाला सुरुवात करतो. साधारण 10 ते 11 पर्यंत काम करतो. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 11 ते 2 काम करतात. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री 2 ते 4 या वेळेत काम करतात. त्यामुळे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आमचे सरकार सदैव तत्पर आहे,” असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा –  महावितरणकडून सुरक्षाठेवीची रक्कम भरण्याचे आवाहन

“राज्य सरकारची कोणतीही कार्यालये भाडेतत्त्वावर ठेवायची नाहीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जनतेला उत्तम सुविधा मिळाव्यात, यासाठी महायुती सरकार काम करत आहे. येत्या दोन-तीन वर्षात सर्व इमारतींचे काम पूर्ण झाले पाहिजे. मला सरकारी कार्यालये चांगली करण्याची आवड आहे. नागरिकांना आवश्यक सुविधा मिळायला पाहिजेत. पार्किंगची समस्या मोठी आहे. त्यामुळे आता बांधल्या जाणाऱ्या इमारतींमध्ये पार्किंगची व्यवस्था केली जाईल,” असे अजित पवार यांनी सांगितले.

“सर्व सरकारी इमारतींवर सौर पॅनेल बसवले जातील आणि वीज निर्मिती कशी करता येईल, याचा विचार सुरू आहे. आरोग्याच्या सर्व सुविधा एकाच छताखाली आणण्याचे काम सुरू आहे. राज्यातील जनतेला जलद आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे. ससून रुग्णालयाला आवश्यक निधी दिला जात आहे. पुण्यात अनेक प्रशासकीय इमारतींचं काम सुरू आहे. पोलिस आयुक्तालयासाठी १९३ कोटी रुपये, एसपी कार्यालयासाठी ६२ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत,” अशी माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button