Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

“महिला मतदारांची भूमिका निर्णायक..”; डाॅ. नीलम गोऱ्हे

पुणे : वाहतूक कोंडीमुक्त आणि भयमुक्त पुण्याची निर्मिती, दोन लाख महिलांना लखपती बनविणे, बचत गटातील महिलांना ५० हजारांचे अनुदान देणे, प्रलंबित वाड्यांचे प्रश्न मार्गी लावणे, झोपडपट्ट्यांचे पुर्नवसन करून प्रत्येक झोपडीधारकाला पाचशे चौरस फुटांचे घर यांसह शहरातील विविध १८ विकासाच्या मुद्यांवर शिवसेना पूर्ण ताकदीनिशी प्रचारात उतरली आहे, असे शिवसेना नेत्या डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही मुख्य केंद्रबिंदू असून, महिला मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी युवासेना प्रदेश सचिव किरण साळी उपस्थित होते.

‘शिवसेनेचा पुणेकरांना शब्द’ असे नाव असलेला हा वचननामा पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मतदारांपर्यंत पोहोचविणार असून, पुणेकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील राहणार आहे, असेही सांगत डाॅ. गोऱ्हे म्हणाल्या, पुण्यासह पीएमआरडीए परिसरातील पायाभूत प्रकल्पांच्या उभारणीत पुणेकरांना सहभागी करून घेण्यासाठी ‘पुणे विकास परिषद’ स्थापन केली जाणार आहे. पुणे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सक्षम पॅथॉलॉजी लॅबची उभारणी, वाढत्या गुन्हेगारीला वेसण घालून भयमुक्त शहराची निर्मिती केली जाईल.

हेही वाचा –  ‘ग्रंथालय चळवळीला नवे बळ देण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी सहकार्य’; मंत्री चंद्रकांत पाटील

महापालिकेच्या शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण, वाहनोद्योगाचे केंद्र असलेल्या पुण्यात ‘ऑटोमोबाइल आणि एआय इंजिनिअरिंग’चे शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयाची उभारणी, ग्लोबल गणेशोत्सवातून पर्यटन व रोजगाराला चालना, मेट्रोच्या जाळ्याचा आळंदीपर्यंत विस्तार, रेल्वेस्थानकांवर कार्गो हब, संगीत रंगभूमी संग्रहालय, गानकोकिळा लता मंगेशकरांच्या स्मरणार्थ लता वाटिका आणि खुले कलादालन उभारणी, असा पुण्याचा सर्वांगीण विकास करण्याचे शिवसेनेचे ध्येय असल्याचे त्यांनी जाहीर केले.

महापालिका निवडणुकीत पुण्यातील महिला मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याने, महिला पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात लाभार्थी महिलांशी थेट संवाद साधला जाणार आहे. विकासकामांसोबतच कल्याणकारी योजनांच्या जोरावर सरकारचे काम घराघरात पोहोचवण्यावर शिवसेनेचा भर राहणार आहे. दरम्यान, प्रचार मोहिमेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत यांसह दिग्गज नेते सभा, पदयात्रेला उपस्थित राहणार आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button