Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोठ्या मुर्तींच्या विसर्जनाचा अडसर लवकरच दूर होईल; आशिष शेलारांनी दिले आश्वासन

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना परवानगी मिळाल्यानंतर मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या मूर्तींच्या विसर्जनाची अडचण लवकरच दूर होईल, असे आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी दिले. अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटना (महाराष्ट्र), अखिल सार्वजनिक उत्सव समिती (महाराष्ट्र), सार्वजनिक उत्सव समिती, मुंबई यांनी रविवारी संयुक्तपणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि गणेशभक्तांचा जाहीर मेळावा आयोजित केला होता. परळ येथील डॉक्टर शिरोडकर हायस्कूल येथे पार पडलेल्या या मेळाव्यात शेलार बोलत होते.

विसर्जनाच्या बाबतीत राज्य सरकार धोरण ठरवेल. हिंदू संस्कृती आणि गणेशोत्सवावर कोणतीही गदा येऊ देणार नाही. महाविकास आघाडी आणि उद्धव सेनेने मूर्तिकारांना देशोधडीला लावण्याचे काम केले, असे शेलार बोलताना म्हणाले. मुंबईतील गणेशोत्सव टिकवण्याची लढाई भारतीय जनता पक्षाने शिरावर घेतली असून आता पीओपीच्या मूर्तींना परवानगी मिळाली आहे. या संपूर्ण लढ्यात महाराष्ट्रातील मूर्तिकार बांधवांनी एकजुटीने लढा दिला व जिंकलो, याचाही त्यांनी आनंद त्यांनी व्यक्त केला. तसेच शाडू आणि मातीच्या मूर्ती बनवणे चालूच राहील. यासोबतच विसर्जनाच्या बाबतीत राज्य सरकार धोरण ठरवेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

हेही वाचा –  शिवसैनिकांचा रुद्रावतार.! उद्धवसेनेकडून स्मार्ट मीटरला विरोध

गेली काही वर्षे हिंदुत्वाचे प्रतीक असलेला सार्वजनिक गणेशोत्सव बंद करण्याचा जणू घाटच घातला आहे. हे षडयंत्र काँग्रेस, राष्‍ट्रवादी काँग्रेस (शप) आणि उबाठा सेना सहभागी असून हा शहरी माओवाद्यांचा अजेंडा आहे, असा घाणाघात करताना त्यांनी महाविकास आघाडीवर देखील टीका केली. ३० जूनच्या आत सरकार याबाबत आपली भूमिका न्यायालयात मांडेल, असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button