Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
“राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी पुरेसा वेळ मिळावा”; शरद पवारांची मागणी

मुंबई : राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 च्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. संयुक्त पूर्व परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या जागा वाढ संदर्भात शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर शरद पवारांनी या संदर्भात पुढाकार घेणार असल्याचे म्हटले आहे.
शरद पवार यांनी या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये शरद पवार यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच या मागणीसाठी मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवणार असून आज दूरध्वनीवर देखील संपर्क साधणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.