Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लग्नाच्या १० महिन्यातचं मृत्यूला कवटाळलं; पंकजा मुंडेंच्या PA च्या पत्नीने जीवन का संपवलं? धक्कादायक माहिती समोर

Anant garje : भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॅाक्टर गौरी पालवे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घडना घडली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. वरळीतील राहत्या घरी गौरी यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. काल सायंकाळी सात वाजता त्यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी वरळी पोलीस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचे लग्न फेब्रुवारी महिन्यात झाल्याची माहिती आहे. या लग्नाला पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या. अनंत गर्जेंच्या पत्नीने टोकाचे पाऊल उचल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. गौरी या वरळी बीडीडी येथे राहत्या होत्या. केईएम रुग्णालयात डेटिस विभागात त्या कार्यरत होत्या. त्यांचा मृतदेह रुग्णालयात असून त्यावर पोस्टपार्टम केले जाणार आहे. त्यांनंतर सत्य समोर येईल असे सांगितले जात आहे. या घटनेनंतर मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमधील आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची माहिती आहे.

हेही वाचा –  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत तुकडेबंदी कायदा लागू होणार नाही; राज्य शासनाचा निर्णय

या घटनेनंतर अनेक चर्चा होत आहेत. लग्नाला अवघे दहा महिनेच झाले होते. या दहा महिन्यांत असं काय घडले ज्यामुळे डॅाक्टर गौरी यांनी आपले आयुष्य संपवले. आता कुटुंबांयाकडून सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याचा आरोप केला जात आहे.  काही दिवसांपूर्वीच डॉक्टर तरुणीने आपल्या पतीविरूद्धचे पुरावे वडिलांना व्हॉट्स अॅपद्वारे पाठवले होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही आत्महत्या आहे की त्यामागे इतर कोणता संशयास्पद प्रकार आहे, याचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button