Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

रुपाली ठोंबरे काश्मीरमध्ये; सांगितली भयावह परिस्थिती , सरकारकडे केली महत्त्वाची विनंती

Rupali Thombre :  जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्या रूपाली ठोंबरे कुटुंबासह जम्मू काश्मीरमध्ये गेल्या आहेत. पहलगाममधील हल्ल्यानंतर त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत असल्याची माहिती दिली. तसेच त्यांनी तेथील परिस्थितीबाबत माहिती देत अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात येण्याची तत्काळ सोय करावी अशी विनंती सरकारकडे केली आहे.

रूपाली ठोंबरे यांनी सांगितले की, “मी माझ्या सर्व कुटुंबासह श्रीनगर जम्मू काश्मीरला फिरायला आलो होतो. आजचा हल्ला झाल्यानंतर इथले सर्वजण प्रचंड घाबरलेले आहेत. काही पर्यटक आजच आलेले आहेत. काही जणांच्या परवा आणि त्यानंतरच्या फ्लाइट्स आहेत. त्यामुळे माझी महाराष्ट्र शासनाला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना विनंती आहे की इथे जे पर्यटक अडकून पडले आहेत त्यांना तात्काळ येण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी. कारण इथे प्रचंड घबराट पसरली आहे. सर्व पर्यटक आपल्या लहान मुलांसोबत फिरायला आले होते.”

हेही वाचा –  पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे स्केच सुरक्षा दलाकडून प्रसिद्ध ; लष्कराकडून शोध मोहीम सुरू

“काल आम्हाला पहलगामला गेल्यानंतर असा कोणतही वातावरण वाटले नाही. परंतु आजची परिस्थिती ऐकून जेव्हा आम्ही गंडोलाला होतो. तेव्हा आम्हाला तातडीने तिथला परिसर रिकामा करायला लावला. माझी शासनाला विनंती आहे की, इथे महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक येथील पर्यटक 80 ते 90 टक्के आहेत. ते इथे अडकून पडले आहेत. प्रचंड घाबरलेले आहेत. त्यांना तातडीने सुरक्षितरित्या आपआपल्या राज्यात नेण्यासाठीची विमानसेवा उपलब्ध करुन द्यावी,” अशी विनंती यावेळी रुपाली ठोंबरे यांनी केली आहे.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झाला. यात डोंबिवलीच्या तिघांचा, पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा समावेश आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button