लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट, जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्व संध्येला मिळणार

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा सन्मान निधी (1500 रुपये) वितरित करण्यात येणार आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल. अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर दिली आहे.
हेही वाचा – नेत्यांनी सत्य बोललेच पाहिजे; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अपेक्षा; लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान
गेल्या काही दिवसांपासून जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत लाभार्थ्यांकडून विचारणा करण्यात येत होती. मात्र याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा करत जुलै महिन्याचा हप्ता 8 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस खात्यात जमा होणार असल्याची माहिती दिली आहे. तर दुसरीकडे सरकारकडे लाडकी बहीण योजना चालवण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे.





