Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

बनियन-टॉवेलवर विरोधी पक्ष विधान भवनाच्या दारात; आंदोलन ठरले चर्चेचा विषय

मुंबई : शिवसेना शिंदे गटाविरोधात आज विरोधक आक्रमक झाले असून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी बाकावरील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी थेट बनियन-टॉवेलवर आंदोलन केले. या आंदोलनाने चांगलेच लक्ष वेधून घेतले. यावेळी मविआ आमदारांनी चड्डी बनियन गँग हाय हाय, या गुंडाराज सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, या लुटारू सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, अशा घोषणा दिल्या.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कँटिनमधील जेवणाच्या दर्जावरून कँटिन कर्मचार्‍यांना मारहाण केली. त्यावेळी संजय गायकवाड हे टॉवेल आणि बनियानवर आले होते. त्यानंतर राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत संजय शिरसाट हे बनियावर दिसून आले होते. या दोन्ही घटनेचा मुद्दा विरोधकांनी चांगलाच धरुन ठेवला आहे.

हेही वाचा –  ‘चंद्रपूर जिल्ह्यातील १४ गावे महाराष्ट्रात समाविष्ट करुन घेण्यात येणार’; महसूल मंत्री बावनकुळे

गायकवाड यांच्या मारहणीच्या निषेधार्थ विधानसभेच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवरती जोरदार आंदोलन केलं.

यावेळी चड्डी बनियन गँग हाय हाय, या गुंडाराज सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, या लुटारू सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, अशा घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात आला. या आंदोलनामध्ये संजय गायकवाड यांच्या विरोधातील बॅनर सुद्धा लक्ष वेधून घेत होता. महाराष्ट्राची लूट करणाऱ्या चड्डी बनियनचा धिक्कार असो असा या बॅनरवरती उल्लेख करण्यात आला होता, तर बाजूलाच संजय गायकवाड यांचा बॉक्सिंग वेशामध्ये फोटो होता.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button