Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुंबई व पुणे विद्यापीठांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याबाबत बैठक

मुंबई : राज्यातील अनेक आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी दुर्गम भागातून मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये येतात. या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक परिसरात राहण्याची सोय व्हावी यासाठी मुंबई व पुणे विद्यापीठाच्या परिसरात वसतिगृह उभारण्यासंदर्भात आढावा बैठक आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

बैठकीस मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, ठाणे अप्पर आयुक्त गोपीचंद कदम, सहसचिव मच्छिंद्र शेळके, मुख्य अभियंता उज्वल डाबे उपस्थित होते.

हेही वाचा –‘गडचिरोलीचे भविष्य उज्ज्वल; विकास कामांना गती देण्यासाठी यंत्रणांनी ऑनफिल्ड कामावर लक्ष केंद्रीत करावे’; मुख्य सचिव राजेश अग्रवाल

आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभाग नेहमीच प्रयत्नशील असतो. अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपला जिल्हा सोडून इतर जिल्ह्यात जात असतात. या वसतीगृहांचा लाभ केवळ विद्यापीठातीलच नव्हे तर विद्यापीठाशी संलग्न विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना सुरक्षित व परवडणाऱ्या निवासाची सोय उपलब्ध होणार आहे. आगामी काळात राज्यातील इतर प्रमुख विद्यापीठांच्या परिसरातही अशाच प्रकारच्या वसतीगृह सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आदिवासी समाजाचा इतिहास आणि संस्कृती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रमुख विद्यापीठामध्ये आदिवासी अध्ययन व संशोधन केंद्र सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button