Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

‘शिल्पकार राम सुतार यांच्या शिल्पांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली : विख्यात शिल्पकार राम सुतार यांनी शिल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशाचा नावलौकिक जगभरात वाढविला आहे. त्यांनी घडविलेली शिल्पे इतिहासाची साक्षीदार असून त्यातून अभिव्यक्त होणारा वारसा शेकडो वर्ष अबाधित राहील, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिल्पकार राम सुतार यांचा गौरव केला.

शिल्पकार राम सुतार यांना  राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा  ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार (२०२४) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. नोएडा (उत्तर प्रदेश) येथील राम सुतार यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, खासदार महेश शर्मा, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा,  महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त व सचिव आर विमला, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, अनिल सुतार आदी उपस्थित होते.

शिल्पकला क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल शिल्पकार राम सुतार यांना हा पुरस्कार देण्यात आला असून सन्मानचिन्ह, मानपत्र आणि  २५ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राम सुतार यांनी घडविलेली शिल्पे अतिशय परिपूर्ण असून जगभरात ती दिमाखात उभी आहेत. त्यांच्या विविध कलाकृती त्यांच्यातील श्रेष्ठ कलाकाराची साक्ष देतात. राम सुतार  यांच्या जीवनातील शिल्पांचे महत्व अलौकिक असून त्यांच्या असामान्य सृजनशीलतेचा अविष्कार अनेक कलाकृतींमधून अनुभवयाला मिळतो. राम सुतार यांच्या मनात महाराष्ट्र असून त्याची प्रचिती पुरस्कार प्रदान करतेवेळी त्यांनी केलेल्या महाराष्ट्राच्या जयघोषातून आली. राम सुतार यांच्यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची उंची वाढली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

हेही वाचा –  बिहारमध्ये पुन्हा एकदा NDAची सत्ता, विक्रमी बहुमत; काँग्रेससह राजदचीही निकालात धुळधान….

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की राम सुतार यांनी केवळ देशातच नव्हे तर जगभर शिल्पे उभारली आहेत. देशाचे स्टॅच्यूमॅन अशी त्यांची ओळख असून अनेक उंच पुतळे उभारणाऱ्या राम  सुतार यांच्यामुळे पुरस्काराचीच उंची वाढली आहे. प्रतिभावान ऋषीतुल्य व्यक्तिमत्व असलेले राम सुतार हे मराठी माणसाचा मानबिंदू आहेत.

महाराष्ट्र आणि देशाने राम सुतार यांच्या श्रेष्ठ कलेची अनुभूती घेतली असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की  राम सुतार हे महाराष्ट्राचा अभिमान असून त्यांचे या क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. त्यांनी निर्मिलेला भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा इंदू मिल येथील स्मारकामध्ये उभारण्यात येणार आहे.

सुतार परिवाराच्या वतीने अनिल सुतार यांनी मनोगतात या सन्मानाबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार मानले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम सुतार यांच्या प्रकृतीची विचारपूस करुन सुरु असलेल्या उपचारांची माहिती घेतली. यावेळी  स्वाती सुतार, सोनाली सुतार, समीर सुतार, दिवाकर शर्मा, कुलदीप मित्तल यांसह विविध अधिकारी आणि  सुतार कुटुंबातील सदस्य यावेळी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button