Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

लाडकी बहीण योजनेचा लाभ हवा असेल तर ‘ही’ चूक करू नका

सातारा : लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीची मुदत संपायला अवघे सहा दिवस बाकी आहेत. सुरुवातीला सर्व्हर डाउन असल्याने, केवायसी करायला अडचण येत होती. आता हा अडथळा दूर झाला असला, तरी घटस्फोटीत व विधवा महिलांना कागदपत्रांसाठी कसरत करावी लागत आहे. ऑनलाइन केवायसी अद्याप न झालेल्या महिलांची अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरण्यासाठी आणि कागदपत्रे देण्यासाठी धावपळ सुरू आहे.

लाडकी बहीण योजनेची ई-केवायसीची मुदत वाढवून 31 डिसेंबर करण्यात आली आहे. केवायसी फॉर्म ऑनलाईन भरायचा होता. हा फॉर्म भरण्यासाठी महिला महा ई सेवा केंद्रात जात असल्या, तरी सर्व्हर डाउन असल्याने फॉर्म भरता येत नव्हते. केवायसी करण्यासाठी महिला सलग आठ दिवस फेर्‍या मारत होत्या. त्यातही दहापैकी एका महिलेची ऑनलाइन केवायसी होत होती.

आता डिसेंबर महिना संपत आला असला, तरी 50 टक्के लाभार्थी महिलांना फॉर्म भरता आलेले नाहीत. अखेर ई-केवायसीची मुदत संपायला शेवटचे 15 दिवस शिल्लक असताना, सरकारने ही प्रक्रिया ऑफलाइन केली. अंगणवाडी सेविकांकडे कागदपत्रे जमा करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार महिलांनी अंगणवाडी सेविकांकडे कागदपत्रे जमा करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सेविकांवर पुन्हा ई-केवायसीचा भार वाढला आहे.

हेही वाचा –  नागपूरमध्ये होणार भाजप- शिवसेना युती ! चंद्रशेखर बावनकुळे लवकरच करणार घोषणा

ई-केवायसी करण्यासाठी महिलांना वडील किंवा पतीचे आधारकार्ड जोडणे बंधनकारक आहे; परंतु अनेक विधवा महिलांनी पतीच्या मृत्यूचे दाखले काढले नसल्याने, त्यांना फॉर्म भरता येत नाही. या महिला मृत्यूचे दाखल काढण्यासाठी धडपडत आहेत. अशीच अवस्था घटस्फोटीत महिलांची आहे. न्यायालयात केस सुरू असून, अद्याप घटस्फोट मिळालेला नाही, अशा अनेक महिला आहेत. कागदपत्रे नसल्याने, त्यांचीही फॉर्म भरताना अडचण होत आहे.

या योजनेचा हप्ता ऑक्टोबरपासून मिळालेला नाही. नगरपालिकांच्या निवडणुकीनंतर हप्ता मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्याला आता ई-केवायसीचे ग्रहण लागले आहे. केवायसी केलेल्या महिलांनाही हप्ता मिळालेला नाही. या महिलांना हप्ता कधी मिळणार यांची प्रतीक्षा आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button