Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

“मी शांत आहे, याचा वेगळा अर्थ घेऊ नका”; विधानसभेतील हाणामारीनंतर पडळकरांचा सूचक इशारा

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे 2025 चे पावसाळी अधिवेशन सध्या वादळी ठरत असून, 16 आणि 17 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात झालेल्या वादानंतर निर्माण झालेल्या राजकीय घडामोडींनी वातावरण अधिकच तापवले आहे. या घटनेनंतर गोपीचंद पडळकरांनी  माध्यमांशी संवाद साधताना एक सूचक आणि लक्षवेधी इशारा दिला आहे.

पडळकर म्हणाले, “जास्त बोलायला लावू नका. मी शांत आहे, याचा वेगळा अर्थ घेऊ नका. कोण किती धुतल्या तांदळाचा आहे, हे मला माहिती आहे. माझ्याकडे डॉक्युमेंट आहे. पण मला सूचना म्हणून मी शांत आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, त्यांनी विरोधकांविरोधात काही गंभीर पुरावे लपवून ठेवले आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा – कालच्या राड्यानंतर विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय, अधिवेशन सुरू असताना केवळ ‘यांना’च प्रवेश

या साऱ्या वादाला सुरुवात झाली ती 17 जुलै रोजी विधानभवनाच्या लॉबीत घडलेल्या हाणामारीमुळे. आव्हाड आणि पडळकर यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या या झटापटीत कॉलर पकडणे, शिवीगाळ आणि कपडे फाटण्याचे प्रकार घडले. जितेंद्र आव्हाड यांनी यानंतर आरोप केला की, गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी त्यांचे सहकारी नितीन देशमुख यांना मारहाण केली आणि त्यांच्या (आव्हाड) जीवावरही उठण्याचा कट रचला गेला. या घटनेनंतर दोन्ही गटांतील काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर, आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवल्याने त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे खेद व्यक्त करत, आपल्या कार्यकर्त्यांच्या वागणुकीसाठी दिलगिरी दर्शवली. परंतु माध्यमांशी बोलताना त्यांनी दिलेला सूचक इशारा आणि “डॉक्युमेंट” असण्याचा दावा या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण देतो आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button