Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘महानगरपालिका निवडणुकीसाठी EVM तपासणी, तयारीला गती’; राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (EVM) प्राथमिक तपासणी करून ती सज्ज ठेवण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले. विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

वाघमारे यांनी सांगितले की, निवडणूक तयारीसाठी आतापासूनच सतर्क राहणे गरजेचे आहे, जेणेकरून ऐनवेळी गोंधळ टाळता येईल. मतदार संख्या, मतदान केंद्रे, EVM आणि मनुष्यबळ यांची उपलब्धता तपासावी. EVM तपासणीनंतर त्यांच्या आवश्यक संख्येचा अंदाज घेता येईल. विभागीय आयुक्तांनी समन्वयकाची भूमिका घेऊन महानगरपालिका आयुक्तांशी सातत्याने आढावा घ्यावा. नियोजनबद्ध तयारी आणि समन्वयामुळे निवडणुका मुक्त, निर्भय आणि पारदर्शकपणे पार पाडणे शक्य होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –  जिल्ह्यात बेकायदा डोंगरफोडीची चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत कबुली

सचिव काकाणी यांनी मतदार संख्येनुसार मतदान केंद्रांची अचूक संख्या निश्चित करण्याचे महत्त्व सांगितले. यामुळे EVM आणि मनुष्यबळ नियोजन सुलभ होईल. आजूबाजूच्या जिल्ह्यांतून मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यासाठी विभागीय आयुक्तांनी समन्वय साधावा. सर्व तयारीचा तपशीलवार आणि अद्ययावत अहवाल तयार ठेवावा, ज्याचा वेळोवेळी आढावा घेतला जाईल, असे त्यांनी नमूद केले.या बैठकीत निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला. यामुळे आगामी निवडणुकीसाठी सर्वंकष तयारीला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button