Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

मतदानाची वेळ कमी करण्याचा निर्णय, काय आहे नवा बदल? जाणून घ्या…

BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, त्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. मुंबईत एकूण एक कोटींपेक्षा अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मात्र, यावेळी मतदानाचा कालावधी एका तासाने कमी करण्यात आल्याने अनेक मतदान केंद्रांवर गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महापालिका निवडणुकीसाठी मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी निश्चित करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांमध्ये हाच कालावधी लागू राहणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. याआधी विधानसभा निवडणुकीत मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ अशी होती.

हेही वाचा –  ‘नवी मुंबई हे भविष्यातील आर्थिक केंद्र; या शहराच्या विकासात कोणालाही अडथळा आणू देणार नाही’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

निवडणुकीच्या तयारीबाबत महापालिका मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी फरोग मुकादम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा, मतदारांसाठी सोयी, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि मार्गदर्शक सूचना यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे गगराणी यांनी स्पष्ट केले.

मुंबईत एकूण १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ मतदार असून त्यात ५५ लाख १६ हजार ७०७ पुरुष, ४८ लाख २६ हजार ५०९ महिला आणि १ हजार ९९ अन्य मतदारांचा समावेश आहे. शहरात २,२७८ ठिकाणी १०,२३१ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. मुंबईत १ लाख ६८ हजार दुबार मतदार असून त्यापैकी ४८,६२८ मतदारांनी आधीच हमीपत्र दिले आहे.

उर्वरित दुबार मतदारांवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. मतदार माहिती चिठ्ठीचे वितरण सुरू असून १२ जानेवारीपर्यंत सुमारे ६० लाख चिठ्ठ्या घरोघरी पोहोचवण्यात आल्या आहेत. निवडणूक शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button