कौतुकास्पद! आता दहावीपर्यंतचे शिक्षण मिळणार पूर्णपणे मोफत, ‘या’ महानगरपालिकेने घेतला निर्णय

अहमदाबाद : अहमदाबाद महानगरपालिकाद्वारे संचालित स्कूल बोर्डने एक मोठा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत आता महानगरपालिका संचालित शाळांमध्ये दहावीपर्यंत मोफत शिक्षण उपलब्ध असेल. या निर्णयानुसार, पुढील शैक्षणिक सत्र २०२५-२६ पासून प्रत्येक झोनमध्ये एक माध्यमिक शाळा सुरू केली जाईल. यानंतर, अशा शाळा टप्प्याटप्प्याने इतर भागात सुरू केल्या जातील. या निर्णयामुळे पालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल.
अहमदाबाद स्कूल बोर्डाचे अध्यक्ष सुजय मेहता यांनी या संदर्भात सांगितले की, सध्या महानगरपालिकेद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये आठवीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. आता दहावीपर्यंतचे शिक्षणही मोफत दिले जाईल. असे दिसून येते की आठवी इयत्ता पूर्ण केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. त्यामुळे त्यांच्या पालकांना खूप आर्थिक भार सहन करावा लागतो. यातून दिलासा देण्यासाठी शाळा मंडळाने दहावीपर्यंत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुस्तके आणि गणवेश मोफत यासारखे फायदेही मिळतील.
हेही वाचा – ‘आगामी काळात मतदार याद्यांमध्ये सुधारणा करून परिपूर्ण करणार’; जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी
आगामी शैक्षणिक सत्र २०२५-२६ पासून, सातही झोनमध्ये प्रत्येकी एक माध्यमिक (इयत्ता १० वी पर्यंत) शाळा सुरू केली जाईल. सध्या शहरात महानगरपालिका शाळा मंडळामार्फत पहिली ते आठवीपर्यंतच्या ४०० हून अधिक शाळा चालवल्या जातात. आता बाल मंदिर ते दहावीपर्यंतचे मोफत शिक्षण महानगरपालिका शाळा मंडळाकडून दिले जाईल. शाळा मंडळाच्या या निर्णयाचा येत्या काळात शहरातील १.७० लाख विद्यार्थ्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.